AccidentNewsUpdate : उभ्या कंटनेरवर कार आदळली , एकाच कुटुंबातील पाच जण ठार

पुणे : पुणे-बंगळूर महामार्गावर आज कासेगाव नजीक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटनेरवर कार आदळून झालेल्या भीषण अपघातात जयसिंगपूर येथील एकाच कुटुंबातील पाच जण ठार झाले. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटनेरवर कार आदळून ही दुर्घटना घडली. कासेगाव (ता. वाळवा) येथे महामार्गावर येवलेवाडी फाट्यावर शर्यत हॉटेल जवळ कार आणि कंटेनर यांच्यात दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला .
या अपघाताची अधिक माहिती अशी कि , येवलेवाडी फाट्याजवळ असलेल्या हॉटेल शर्यत जवळ आशियाई महामार्गाच्या कोल्हापूर दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला कंटेनर (एमएच ०५ ए एम ३६४४) थांबलेला होता, मात्र कोल्हापूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने (एमएच १४ डी एन ६३३९) उभ्या असलेल्या कंटेनरच्या डाव्या बाजूस जोराची धडक दिली.
अपघातात ठार झालेले अरिंजय आण्णासाहेब शिरोटे , रा. जयसिंगपूर हे नौदलातील अधिकारी होते . यांच्यासह एक महिला स्मिता अभिनंदन शिरोटे (वय ३८) या त्यांच्या भावाच्या पत्नी तर पूर्वा अभिनंदन शिरोटे (वय १४), सुनिशा अभिनंदन शिरोटे (वय ०९), वीरेन अभिनंदन शिरोटे (वय ०४) हि त्यांच्या भावाची मुले आहेत. हे तिघेही गंभीर जखमी झाले होते. त्याना उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर येथे तर दोघांना प्राथमिक आरोग्य केंद्र कासेगाव येथे हलवण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे.