MumbaiCrimeUpdate : साकीनाका बलात्कार प्रकरणात आरोपीला न्यायालयाने ठरविले दोषी

मुंबई : मुंबईच्या साकीनाका येथील बलात्कार आणि खून प्रकरणात आरोपी मोहन चौहानला दिंडोशी सत्र न्यायालयाने दोषी ठरवले असून आरोपी मोहन चौहानच्या शिक्षेवर १ जूनपासून युक्तिवाद होणार आहे. आरोपीने बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात रॉड घुसवला होता यात गंभीर झालेल्या पीडितेचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला होता. मुंबईतील या निंदनीय घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात आला होता.
साकीनाका परिसरात झालेल्या संतापजनक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक करत आरोपपत्र दाखल केले होते. या घटनेत एकच आरोपी आहे. पोलिसांनी ७७ साक्षीदारांचे जबाब नोंद करुन ३४६ पानांचे आरोपपत्र दाखल केले होते.
Mumbai: Man arrested for the alleged rape of a 30-year-old woman, case registered. The woman was found lying unconscious at Khairani Road in the Saki Naka area last night. She is currently under treatment at a city hospital: Police
— ANI (@ANI) September 10, 2021
नेमकं काय घडलं होतं?
खैरानी रोड साकीनाका येथे एक पुठ्ठ्याची कंपनी आहे. १० सप्टेंबर २०२१ च्या रात्री ३ वाजून २० मिनिटाच्या दरम्यान त्या कंपनीच्या सुरक्षारक्षकाने कंट्रोल रुमला फोन करून एका बाईला मारहाण सुरु असल्याचे कळवले होते. माहिती मिळाल्यानंतर कंट्रोल रुमने संबंधित पोलीस स्टेशनला माहिती दिल्यांनतर संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी दहा मिनिटाच्या आत तिथे पोहोचले होते. तिथे त्यांना एका उघड्या टेम्पोत महिला अत्यंत गंभीर अवस्थेत आढळली होती. दरम्यान पोलिसांनी विलंब न लावता महिलेला इतरत्र कुठे शिफ्ट न करता त्याच टेम्पोची चावी वॉचमनकडून घेऊन टेम्पो चालवत तिला राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते मात्र उपचारादरम्यान पीडितेच्या मृत्यू झाला. अखेर सुरक्षारक्षकाच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान दुसऱ्या दिवशी ११ सप्टेंबरला मृत्यू झाला होता. महिलेवर बलात्कार करण्यात आल्यानंतर गुप्तांगात रॉड घुसवण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी ४५ वर्षीय आरोपी मोहन चौहान वर भादंवि 307, 376, 323 आणि 504 अन्वये अटक करून त्याला अटक केली होती.