IndiaNewsUpdate : पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याची तोडफोड !! ६ जणांना अटक

भोपाळ : मध्य प्रदेशातील सतना शहरातील चौकात असलेल्या माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याची समाजकंटकांनी तोडफोड केली असल्याचे वृत्त आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी ६ जणांना अटक केली आहे.
घटनेबाबत ट्विट करताना कमलनाथ यांनी म्हटले आहे कि , “हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील आहे. ज्यात काही समाजकंटक देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याची विटंबना करताना दिसत आहेत. ही घटना अत्यंत निंदनीय आहे.” व्हिडिओमध्ये दिसत आहे, की काही समाजकंटक तोंडाला झाकून नेहरूंच्या पुतळ्यावर काठीने प्रहार करून दगडफेक करत आहेत.
यह विडीओ मध्यप्रदेश के सतना ज़िले का है।
जहाँ देश के पूर्व प्रधानमंत्री स्व.जवाहरलाल नेहरू जी की प्रतिमा को कुछ असामाजिक तत्व क्षतिग्रस्त कर रहे है।यह घटना बेहद निंदनीय है। pic.twitter.com/CPlDwWef3w
— Kamal Nath (@OfficeOfKNath) May 25, 2022
दरम्यान पोलिसांनीही या घटनेची दखल घेतली आहे. सतना शहरातील सह जिल्हाधिकारी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या धवरी चौकात ही घटना घडली आहे. व्हिडिओमध्ये पुतळ्याची तोडफोड करणारे उपद्रवी शिवराज सरकारच्या विरोधात घोषणा देत होते. आणि पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पुतळ्यावर प्रहार करीत दगडफेक करत होते.
हा व्हिडीओ सोशलमिडीयावर व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी या घटनेच्या निषेधार्थ नेहरू पुतळ्याजवळ धरणे आंदोलन सुरु केले आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून तत्काळ काही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
Pt. Jawaharlal Nehru statue was vandalised in Satna. The incident took place at Dhavari square, just about 50 meters away from the collectorate, yesterday evening. The miscreants were carrying saffron flags and shouting slogans against the Shivraj Singh Chouhan government pic.twitter.com/pPvM689wzJ
— Anurag Dwary (@Anurag_Dwary) May 25, 2022