AurangabadCrimeUpdate : विद्यार्थिनीचा भोसकून खून करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी असे जेरबंद केले…

औरंगाबाद : एकतर्फी प्रेमातून औरंगाबाद शहरात काल देवगिरी महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा भोसकून खून करणाऱ्या आरोपीला २४ तासाच्या आत औरंगाबाद गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजाआड करण्यात यश मिळवले. काल गुन्हा घडल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता. त्यामुळे त्याला अटक करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले होते.
दरम्यान त्याच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष पथकांची निर्मिती केली होती. आरोपीच्या घरून त्याच्या नातेवाईकांचे पत्ते पोलिसांनी मिळवले होते त्यानुसार आरोपीची बहीण लासलगावला राहते याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अमोल कोल्हे यांनी त्याच्या बहिणीशी संपर्क साधला तेंव्हा त्याच्या बहिणीनेच पीएसआय अमोल म्हस्के यांना आज दुपारी १२.३० वा. फोन करुन आरोपी शरणसिंग लासलगाव ला त्यांच्या घरी आल्याचे सांगितले. हि माहिती मिळताच पीएसआय मस्के यांनी आपल्या पथकासह जाऊन आरोपीला ताब्यात घेतले.
दरम्यान मालेगाव पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांनी पीएसआय अमोल म्हस्केआणि पथकाला मालेगावला बोलावून त्यांच्या कामगिरीचे कौतूक केले.पोलिसउपायुक्त उज्वला वानकर यांनाही फोन करुन कौतुस्कास्पद कामगिरी झाल्याचे अभिनंदन केले.पोलिस आयुक्ताडाॅ.निखील गुप्ता, पोलिस उपायुक्त अपर्णा गिते, सहाय्यक पोलिस आयुक्त विशाल ढुमे,पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अमोल म्हस्के,पोलिस कर्मचारी ओमप्रकाश बनकर,नवनाथ खांडेकर, तात्याराव शिनगारे यांनी पार पाडली.