SambhajiRajeNewsUpdate : चर्चेतली बातमी : छत्रपती संभाजीराजे यांचा सहाव्या जागेवरील विजय किती सोपा किती अवघड ?

बाबा गाडे
मुंबई : सध्या महाराष्ट्रात छत्रपती संभाजीराजे लढवू इच्छित असलेल्या राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून मोठी चर्चा चालू आहे. यामध्ये संभाजीराजे यांची अडचण अशी झाली आहे कि , एकीकडे संभाजीराजे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत तर दुसरीकडे त्यांनी स्वतःच्या “स्वराज्य ” नावाच्या संघटनेची घोषणा नुकतीच केली आहे. आणि त्यांच्यासाठी हीच मुख्य अडचण झाली आहे.
प्रारंभी त्यांच्या स्वतंत्र पक्षाच्या घोषणेआधी अपक्ष म्हणून त्यांनी हि निवडणूक लढविली असती तर कदाचित त्यांचा हा प्रयोग यशस्वी होऊ शकला असता परंतु आता पक्ष स्थापनेच्या घोषणेमुळे संभाजीराजे सर्वच पक्षांचे प्रतिस्पर्धी झाले आहेत त्यामुळे त्यांना अपक्ष म्हणून पाठिंबा देणार ? असा मोठा प्रश्न आहे. नांदेड येथे त्यांच्या पाठिंब्याविषयी सकारात्मक भूमिका घेणाऱ्या शरद पवार यांनीही आता महाविकास आघाडीची भूमिका तीच आपली भूमिका असे स्पष्ट करून महाविकास आघाडीतील हि सहावी जागा शिवसेनेकडे असल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान संभाजीराजे जर शिवबंधन हातात बांधण्यास तयार असतील तरच त्यांच्या गळ्यात राज्यसभेच्या सहाव्या उमेदवारीची माळ गळ्यात घातली जाईल अन्यथा शिवसेनेने आपल्या निष्ठावंत शिवसैनिकांचे अर्ज तयार ठेवले आहेत असे वृत्त आहे. त्यामुळे आता शिवसेनेत जावे कि , आपण घोषित केलेल्या “स्वराज्य” चे काम करावे याचा निर्णय संभाजी राजे यांना घायचा आहे.
संभाजीराजे उद्या पुन्हा वर्षा बंगल्यावर
दरम्यान या पाठिंब्यावरून छत्रपती संभाजी राजे यांनी वर्ष बंगल्यावर जाऊन शिवसेनेने आपल्याला पाठिंबा द्यावा अशी विनंती केली आहे त्यावर आमचा म्हणजेच शिवसेनेचा पाठिंबा पाहिजे असेल तर शिवसेनेत यावे लागेल अशी ऑफर दिली आहे. आज दुपारी या विषयावरून संभाजी राजे आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची एका हॉटेलवर प्रदीर्घ चर्चा झाली असून उद्या पुन्हा वर्ष बंगल्यावर मुख्यमंत्री आणि संभाजीराजे यांच्यात दुपारी १२ वाजता चर्चा होत आहे.
शरद पवार यांची भूमिका , काँग्रेस अद्याप शांत
आता संभाजी राजेंनी दुसऱ्यांदा वर्षावर जाण्याचे निमंत्रण स्वीकारले असले तरी ते उद्धव ठाकरेंची ऑफर स्वीकारणार का ? आणि स्वीकारणार असतील तर घोषित केलेल्या पक्षाबद्दल काय ? कारण उद्धव ठाकरे युती मध्ये हि जागा देण्याच्या मनस्थितीत नाहीत आणि ती द्यायची झाली तर त्यांना काँग्रेस -राष्ट्रवादी या आपल्या मित्र पक्षांच्या नेत्यांना विश्वासात घ्यावे लागणार हे उघड आहे. याबाबत काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केलेली नसली तरी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट करताना म्हटले आहे कि , आपला संभाजी राजेंना पाठिंबा आहे असे आपण कधीही बोललो नाही. याबाबत आमच्या मित्रपक्षांना बोलावे लागेल असे आपण म्हटले होते जरी राष्ट्रवादी त्यांना पाठिंबा देण्यास तयार असला तरी… पुण्यात मराठा क्रांती मोर्च्याच्या कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी हि भूमिका स्पष्ट केली आहे.
संजय राऊत यांनी काय म्हटले आहे ?
राज्यसभेच्या या सहाव्या जागेबद्दल बोलताना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे कि , संभाजी राजे यांच्याप्रती आम्हाला पूर्ण आदर आहे परंतु त्यांनी ज्या अर्थी अपक्ष म्हणून हि निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे आहे याचा अर्थ त्यांनी आपल्याकडे विजयी होण्यासाठी मतदान आहे याचा अभ्यास केला असेल. शिवसेनेचे विचारलं तर याबाबतचा निर्णय पक्षाचे नेटवे उद्धव ठाकरे घेतील कारण हि सहावी जागा आमची आहे. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारालाच ती दिली जाईल.
या पार्श्वभूमीवर आज मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी सकाळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भेट घेतली. छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी संजय राऊत यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर संजय राऊतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत काय झाले ? याबाबत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून उद्या छत्रपती संभाजीराजे आणि मुख्यमंत्री युद्ध ठाकरे यांच्यात काय निर्णय होतो ? आणि त्यानंतर महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांची भूमिका काय असेल यावर संभाजीराजे यांचे राज्यसभेचे भवितव्य अवलंबून आहे.
दरम्यान संभाजीराजे आपणास महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून संधी देण्यात यावी या मागणीवर ठाम असून दरम्यान ते या विषयावर मराठा मोर्चाच्या सर्व समन्वयकांशी चर्चा करीत आहेत. राज्यसभेच्या सहा जागांसाठी १० जूनला निवडणूक होणार आहे.