Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Ramdas Athawale News Update : रामदास आठवले यांची पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकरांना हाक ….

Advertisements
Advertisements
Spread the love

पुणे : केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना  रिपब्लिकन पक्षासोबत एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. राज्यात आगामी काळात एक वेगळं राजकीय समीकरण उभं राहण्याची शक्यता आहे. पण प्रकाश आंबेडकर यांच्या अनुमतीशिवाय ते समीकरण उभे  राहणे  अशक्य आहे. आपण प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात काम करण्यास तयार असल्याचा पुनरुच्चार देखील त्यांनी केला. 

Advertisements

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवानिमित्त देवळाली कॅम्प शहरात केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकरांना सोबत येण्याचे  आवाहन केले. विशेष म्हणजे रामदास आठवलेंनी प्रकाश आंबेडकरांना आपल्या पक्षाचे  अध्यक्षपद स्वीकारण्याचे  आवाहन केले आहे.

Advertisements
Advertisements

निवडून कसे यायचे ते माझ्याकडून शिका

यावेळी बोलताना आठवले पुढे म्हणाले कि , “रिपब्लिकन पक्षाचे नाव मजबूत करण्यासाठी मी देशभर फिरतो आहे. कोणी वंचितचे नाव देते कोणी इतर. पण मी कायम रिपब्लिकन राहणार. रिपब्लिकन पक्षाला आपल्याला व्यापक बनवायचे आहे. सगळ्या जातीच्या लोकांना त्यात आणायचे आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित समाजाला एकत्र आणण्याचा चांगला प्रयोग केला. पण लोकसभा, विधानसभेला एकही त्यांचा माणूस निवडून आला नाही. निवडून यायचे  असेल तर माझ्याकडून शिका आणि पडायचे असेल तर त्यांच्याकडून. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप असे चार मोठे पक्ष, मनसे पण एक आहे. आपण एकत्र यायला पाहिजे. बाळासाहेब आंबेडकरांना माझे नम्र निवेदन आहे की, समाजाच्या हितासाठी आपण एकत्र यायला पाहिजे. आपण माझ्या पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारा. नेतृत्व घ्या. मी तुमच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार आहे”.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!