Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : रेकाॅर्डवरच्या गुन्हेगाराचा खून, आरोपीवरही उपचार सुरु

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – रेकाॅर्डवरच्या गुन्हेगाराने त्याच्या साथीदारावरच मध्यरात्री १२च्या सुमारास चाकुने खुनी हल्ला करुन ठार केले. या प्रकरणी आज पहाटे ५वा.जिन्सी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे.व आरोपीवरही घाटी रुग्णालयात पोलिस निगराणीत उपचार सुरु असल्याची माहिती पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी दिली.

Advertisements

शेख शाहरुछ शेख अन्वर (१७) रा.गल्ली नंबर ३०बायजीपुरा असे मयताचे नाव आहे.तर हैदरखान पिता जाफरखान (२२) संजयनगर गल्ली नंब सी११ असे जखमी आरोपीचे नाव आहे.मयतावर जिन्सी पोलिस ठाण्यात चोरी, खंडणी, जबरी चोरी असे सहा गुन्हे दाखल आहेत.तर आरोपी हैदरखानवर एक गुन्हा जिन्सी पोलिस ठाण्यात दाखल आहे. दोन्ही आरोपी नशेमधे राहून नागरिकांमधे दहशत पसरवत होते.

Advertisements
Advertisements

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बायजीपुर्‍यातील सिकंदर हाॅल समोर रात्री११.३०ते१२च्या दरम्यान आरोपी हैदरखान ने किरकोळ कारणावरुन मयत शाहरुख वर जीवघेणा हल्ला केला आरोपीच्या छातीवर, पाठीवरपोटावर व मांडीवर चाकूचे सपासप वार केले.या घटनेनंतर गंभीर जखमी शाहरुख ला पोलिसांनी घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.पण डाॅक्टरांनी तपासून शाहरुख ला मयत घोषित केले.यावेळी आरोपीही जखमी झाल्यामुळे त्याला पोलिसांनी उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले आहे.या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेश मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय तांगडे करंत आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!