Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

NagpurAccidentNewsUpdate : ट्रक आणि तवेरा कारच्या भीषण अपघातात ७ प्रवासी ठार

Advertisements
Advertisements
Spread the love

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील उमरेड उमरगाव फाट्या जवळ ट्रक आणि तवेरा कार मध्ये झालेल्या भीषण अपघातात सात प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अपघात इतका भीषण होता की चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये ६ पुरूष आणि एका महिलेचा समावेश आहे.

Advertisements

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री ११ वाजताच्या सुमारास टवेरा कार ही नागपूरच्या दिशेने येत होती. ट्रकला ओव्हरटेक करताना चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने ट्रकला पाठीमागून धडक दिली. कार खूप वेगाने असल्याने ट्रकला जोरात धडक दिली. कारमध्ये दहा प्रवासी होते त्यापैकी सात प्रवाशांचा मृत्यू झाला तीन प्रवासी जखमी झाले त्यामध्ये एका चिमुकलीचा देखील समावेश आहे.

Advertisements
Advertisements

मृतांमध्ये सागर शेंडे रा. पिवळी नदीजवळ, उप्पलवाडी (टवेराचालक), मेघा आशिष भुजाडे रा. नझूल ले-आउट बेझनबाग, देविदास गेडाम, नरेश डोंगरे रा. भीमचौक, इंदोरा अशी मृतांची नावं आहे. तर उर्वरित मृतांची नावं अद्याप समजू शकलेली नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!