RajThackerayNewsUpdate : राज ठाकरे यांच्या यांच्यावर कारवाईची शक्यता ..

औरंगाबाद : औरंगाबाद येथील बहुचर्चित सभेला 16 अटींचे पत्र देऊन पोलिसांनी परवानगी दिली होती मात्र या सभेतही राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे तीन दिवसात हटविले नाही तर 4 तारखेनंतर “सरळ सांगून भोंगे निघणार नसतील तर मग होऊन जाऊ द्या..” असे वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे अडचणीत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या सभेत बोलताना , केवळ महाराष्ट्रात नाही तर देशातील भोंगे हटविले पाहिजेत असे बजावताना, सरळ सांगून करत नसतील त्यांना आता एकदा महाराष्ट्राच्या मनगटात काय ताकद आहे, हे दाखवूनच द्या.. तीन तारखेच्या अल्टीमेटमनंतर दुप्पट आवाजात मशीदींसमोर हनुमान चालिसा वाजवा आशा स्पष्ट सूचना दिल्या. दरम्यान त्यांचे भाषण संपत आले तेंव्हा सुरू झालेल्या आजानवरूनही त्यांनी संतप्त होत ” ही पहा यांचं सुरू झालं , माझी पोलिसांना विनंती आहे की , यांचे थोबाड बंद करा .. असे उद्गार काढले . त्यानंतर राष्ट्रगीत झाले आणि सभा संपली .
दरम्यान काल मात्र ईदच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना ट्विटरवरून संदेश देताना म्हटले आहे की , “उद्या ईद आहे. कालच्या संभाजीनगरच्या (औरंगाबादच्या) सभेमध्ये त्याबाबतीत मी बोललो आहेच. मुस्लीम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरवल्याप्रमाणे अक्षय्य तृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करु नका”.
महाराष्ट्र सैनिकांसाठी… pic.twitter.com/zNxanlUVpg
— Raj Thackeray (@RajThackeray) May 2, 2022
“आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण पुढे नेमका काय करायचं, हे मी उद्या माझ्या ट्विटद्वारे आपल्यासमोर मांडेन,” असेही राज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
राज ठाकरे यांच्या अटकेची मागणी
दरम्यान राज ठाकरे यांच्या या सभेवर संपूर्ण महाराष्ट्रसह पोलिसांची करडी नजर होती. त्यानुसार औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरे यांनी कोणत्या अटी शर्थींचं उल्लंघन केले याचा अहवाल तयार केला असून तो पोलीस महासंचालकांकडे योग्य त्या मार्गदर्शनासाठी सादर करण्यात आला असून पोलीस महासंचालकाकडून हा अहवाल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे पाठवला जाणार असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे त्यांच्याकडून सभेत वापरण्यात येणारी भाषा , त्यांनी सरकारला दिलेला इशारा यावरून त्यांना अटक करण्याची मागणी पुढे येत आहे. त्यामुळे राज यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.