Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : भांडण सोडविल्याच्या कारणावरून तरुणाचे पाय तोडले, सहा अटकेत

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद : डॉक्टरसोबत सुरु असलेल्या वादात मध्ये पडून हा वाद रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या मित्राचे पाय बेसबॉलच्या बॅटच्या साह्याने तोडल्याचा धक्कादायक प्रकार हडकोच्या एन-१३ भागातील मैदानात घडला आहे. या प्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी सहा जणांना बेड्या ठोकल्या असून, त्यांचा एक साथीदार मात्र पसार झाला आहे. दरम्यान, अटक झालेल्या सा जणांना नंतर न्यायालयाने १२ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

जटवाडा रोडवरील एका डॉक्टरसोबत अरबाज खान आजम खान (२२, रा. बिबी फातेमा मशिदजवळ, एकतानगर, जटवाडा रोड) हा ८ एप्रिल रोजी सायंकाळी वाद घालत होता. त्यावेळी रोहन अनिल बनकर (२२, रा. एकतानगर, जटवाडा रोड) या मजुराने मध्यस्थी करीत डॉक्टरांशी वाद घालू नको म्हणत अरबाजला रोखले. त्याचा अरबाजला प्रचंड राग आला. यानंतर अरबाजने रोहनला रात्री एन-१३ येथील मैदानात भेटण्यासाठी बोलावून घेतले. तेथे अरबाजने त्याच्याशी वाद घातला. या वादाचे नंतर मारामारीत पर्यवसान झाले.
यावेळी अरबाजसोबत नदीम खान आजम खान (३२), सलमान खान आजम खान (३०), आजम सरदार खान (२७, सर्व रा. बिबी फातेमा मशिदजवळ, एकतानगर, जटवाडा रोड), विजय जगन दांडगे (१८, रा. सिध्दार्थनगर, टीव्ही सेंटर, हडको) आणि अज्जू नवाब पठाण (२०, रा. देहाडेनगर, अंबरहिलजवळ, जटवाडा रोड) तसेच फरार असलेला रितेश साळवे हे सहा जण होते. या सातही जणांनी बेसबॉलच्या बॅटने रोहनच्या पायाच्या नळगीवर बेदम मारहाण केली. या मारहाणीत रोहनचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले. यापूर्वी देखील रोहनला अशाच प्रकारे मारहाण करण्यात आली होती.

Advertisements

दरम्यान नंतर रोहनने याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात सातही जणांविरोधात तक्रार दाखल केली. त्या आधारे बेगमपुरा पोलिसांनी रितेश साळवे वगळता अन्य सहा जणांना अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक विक्रमसिंह चौहाण करत आहेत.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!