उर्मिला मातोंडकरने हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या, चौकिदार पोलीस ठाण्यात

लोकसभा निवडणुकीसाठी अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नुकताच उर्मिला मातोंडकरने काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. उत्तर मुंबईतून काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उर्मिलाच्या विरोधात भाजपाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. एका दुरचित्रवाणीच्या कार्यक्रमात हिंदू धर्माबद्दल अक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत तिच्याविरोधात पवई पोलीस स्टोशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
उर्मिलाने इंडिया टुडे या वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमादरम्यान बोलताना हिंदू हा सगळ्यात जास्त हिंसाचार करणारा धर्म असल्याचे म्हटले होते. तिच्या या वक्तव्याने हिंदूंच्या भावना दुखावल्याचे सांगत भाजपाचे प्रवक्ते सुरेश नाखवा यांनी पवई पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. सुरेश नाखवा यांनी तक्रारीचा फोटो फोटो ट्विटरवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. सुरेश नाखवा यांनी या वक्तव्याला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनाही जबाबदार धरले आहे. तक्रारीमध्ये उर्मिलासोबत राहुल गांधी आणि राजदीप सरदेसाई यांचेही नाव आहे. दरम्यान, उर्मिला मातोंडकर यांनी राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून वक्तव्य केल्याचा ठपका सुरेश नाखवा यांनी तक्रारीत म्हटले आहे. भा.द.वि. कलम २९५ अ नुसार उर्मिला मारतोंडकर आणि राहुल गांधीविरोधात तक्रार दाखल केली आहे.