IndiaNewsUpdate : लाकडाच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीत ११ जणांचा होरपळून मृत्यू

हैदराबाद : तेलंगणातील हैदराबादमध्ये बुधवारी आगीची मोठी घटना समोर आली आहे. सिकंदराबाद भागातील एका लाकडाच्या गोदामाला लागलेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या आगीत एक जण जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर सर्वत्र घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सर्व 11 मृत बिहारचे रहिवासी होते. शॉर्टसर्किटमुळे ही घटना घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सर्व कामगार पहिल्या मजल्यावर झोपले होते. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यासाठी स्थानिक प्रशासन मृतांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. प्रशासनही या घटनेच्या कारणाचा शोध घेत आहे.