Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अल्पवयीन मुलीवर शौचालयात अत्याचार करुन खून

Advertisements
Advertisements
Spread the love

जुहू परिसरातील एका सार्वजनिक शौचालयात नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी जुहू पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Advertisements

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून संबंधित मुलगी बेपत्ता होती. तिचा शोध सुरू असताना आज ती एका सार्वजनिक शौचालयात मृतावस्थेत आढळली. तिच्यावर बलात्कार झाल्याचं वैद्यकीय तपासणीनंतर उघड झालं आहे. परिसरातच राहणाऱ्या एका ३५ वर्षीय इसमानं हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे. त्याच्यावर याआधीही काही गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याला अटक केली असली तरी या भागात प्रचंड तणाव आहे. आरोपीला ताब्यात देण्याची मागणी करत संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!