जालना लोकसभा मतदार संघ अंतर्गत फुलंब्री विधानसभा मतदार संघात 3 लाख 83हजार 900 रुपये जप्त

जालना लोकसभा मतदार संघ अंतर्गत फुलंब्री विधानसभा मतदार संघात स्थिर संरक्षण नियंत्रण पथक क्रं 9 यांच्या पथकाने जालना ते औरंगाबाद रोड वरती जालन्या कडून औरंगाबाद कडे येणारे संशयास्पद चारचाकी वाहन क्रियेटा mh 20 -EY 7257 आढळून आले त्यामुळे करमाड पोलीस यांच्या सहकार्याने सदरील कारचा पाठलाग केला असता कार मध्ये रोख 3 लाख 83हजार 900 रुपये आढळून आले याबद्दल ड्रायव्हर कडे चौकशी केली असता ही रक्कम आर्किटेक्ट यांची असल्याचे त्याने सांगितले परंतु याबद्दल काही पुरावे नसल्यामुळे ही रक्कम जप्त करून करमाड पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आली.पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री रायतवार हे करीत आहेत.सदरील कार्यवाही सहा.निवडणूक निर्णय अधिकारी डॉ भारत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख श्री एस.ए गायकवाड,श्री मधुकर चौधरी, श्री सलमान पठाण,श्री एस बी भालेराव,श्री भगवान पवार यांच्या पथकाने पार पाडली.