News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या : चौकीदारांची नौटंकी संपवा, सत्तेची चावी हातात घ्याः मायावती

1. नागपूर : बसप अध्यक्षा मायावती यांची महाराष्ट्रातील पहिली जाहीर सभा कस्तुरचंद पार्क येथे पार पडली. चौकीदारांची नौटंकी संपवाः बसप अध्यक्षा मायावती यांची टीका; सत्तेची चावी हातात घ्याः मायावतींचे आवाहन
2. मथुराः परवानगीविना सभा घेतल्याप्रकरणी खासदार हेमा मालिनी यांच्याविरोधात एफआयआर दाखल
3. बीडः लोकसभा निवडणुकीत भाजप-सेना-रिपाई-रासप युतीच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या विजयाची गुढी उभारा; आमदार जयदत्त क्षीरसागर यांचे कार्यकर्ता मेळाव्यात आवाहन
4. औरंगाबाद : उमेदवारी अर्जाची छानणी पूर्ण, १२ उमेदवारांचे अर्ज बाद
5. औरंगाबाद: बँकेत नोकरी लावण्याचे आमीष दाखवून ५ लाखांची फसवणूक करत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणात लोकविकास नागरी सहकारी बँकेचा अध्यक्ष जे. के. जाधव याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
6. मुंबई पूल दुर्घटनाः ऑडिटर नीरज देसाई यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
7. राहुल गांधींनी ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणी उत्तर द्यायचे नसेल, तर त्यांच्याकडे उत्तर नाही, असे मानले जाईलः अरुण जेटली
8. बारामती लोकसभा मतदारसंघातील ९ उमेदवारांचे अर्ज बाद, २५ उमेदवार रिंगणात; अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आठ एप्रिल
9. पुणे लोकसभा मतदार संघातील चार उमेदवारांचे अर्ज बाद, ४३ जणांचे अर्ज वैध.
10. जालना: भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या अर्जाविरोधातील हरकत फेटाळली; दानवे यांचा अर्ज मंजूर झाल्यावर वानखेडे यांनी घेतला होता आक्षेप
11. परभणी : मानवतमध्ये आडत व्यापाऱ्याची पाच लाखाची पिशवी दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी पळवली