Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : लहानग्याचा छळ , महिलेसहित एकाला बेड्या, दोघांनाही पोलीस कोठडी

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – कामवाल्या महिलेकडून तिच्या जोडीदाराला सोबत घेत गेल्या पाच वर्षांपासून अल्पवयीन मुलाचा छळ करणाऱ्या मजूरनीला तिच्या प्रियकरासहित सिटीचौक पोलिसांनी बेड्या ठोकल्या . आरोपीना २९ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. भारती रगडे आणि आयुष्य विजय मगरे रा लेबर कॉलनी अशी अटक आरोपीची नावे आहेत.

Advertisements

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनन्वित छळ सहन करणाऱ्या लहानग्याने २१ जानेवारी रोजी पोलीसआयुक्तालय गाठले त्याठिकाणी महिला पोलीस कर्मचारी केदारे यांनी बेगमपुरा पोलिसांना कळवताच बाल कल्याण समितीने पुढाकार घेत खुनाचा प्रयत्न व पॉक्सोचा गुन्हा दाखल केला. लेबर कॉलनीत राहणारा १२ वर्षीय लहानगा आईचे निधन झाल्यामुळे अत्यवस्थ वडील प्रभाकर तायडे यांनी कामवाल्या मजूरनीला २०१७ साला पासून घरकामासाठी ठेवले होते. तेंव्हा पासून महिला आरोपी भारती रगडे व तिचा प्रियकर मगरे तायडे यांच्या घरात घुसून मुलाचा अतोनात छळ करत होते. शेजाऱ्याचा हा प्रकार लक्षात आला होता पण महिला आरोपी मध्यस्थी करायला आलेल्या नागरिकांवर विनयभानगाचा गुन्हा दाखलकरण्याची धमकी देत होती शेवटी लहानग्याने कंटाळून पोलीस आयुक्तालय गाठून पोली साआयुक्तांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर एड. राहुल तानाजी तायडे यांच्या फिर्यादीवरून वरील आरोपीना पोलिसांनी अटक केली वरील प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय इंगळे करत आहेत

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!