Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : साप चावल्यानंतर सलमान खानच्या प्रकृतीविषयी ताजी माहिती …

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : कोरोनाच्या भीतीने आपल्या निवडक मित्रांसह आणि कुटुंबियांसह उद्याच्या वाढदिवसाची तयारी करण्यासाठी स्वतःच्या फार्महाऊसवर गेलेल्या सलमानखानला सापाशी सामना करावा लागला. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून त्याला डिस्चार्ज दिला असल्याचे वृत्त आहे. काल २५ डिसेंबरच्या रात्री त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसमध्ये ही घटना घडली.

दरम्यान सर्पदंश झाल्यानंतर सलमान खानची प्रकृती कशी आहे ? याची माहिती जाणून घेण्यासाठी सलमानचे चाहते उत्सुक आहेत त्यांच्यासाठी हि बातमी आहे. एमजीएमच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या त्याची प्रकृती स्थिर असून एमजीएमच्या डॉक्टरांच्या टीमने सलमानचे हेल्थ चेकअप केले आहे. त्यासाठी डॉक्टरांची टीम सलमानच्या फार्म हाऊसवर दाखल झाली होती.

Advertisements

सलमान खानला सर्पदंश झाल्यानंतर त्याला उपचारासाठी नवी मुंबईच्या कामोठेतल्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . तेथे सलमानवर तब्बल ७ तास उपचार करण्यात आले. दरम्यान प्रकृतीत सुधारणा दिसल्यानंतर डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज दिला. मात्र सलमान खानची तपासणी करण्यासाठी एमजीएमच्या डॉक्टरांची टीम पुन्हा एकदा सलमानच्या फार्महाऊसवर दाखल झाली. या टीमने सेकंड ओपीनियनसाठी सलमान खानची तपासणी केली आहे. सध्यातरी त्याची प्रकृती स्थिर आहे.

Advertisements
Advertisements

त्या रात्री नेमकं काय घडलं ?

२५ डिसेंबरच्या रात्री सलमान खानसाठी त्याच्या अर्पिता या फार्महाऊसवर होता. मात्र त्याला सापाने अचानकपणे दंश केला. आपल्याला साप चावल्याचे समजताच सलमानने मदतीसाठी आरडाओरड केली. तसेच जवळच्या लोकांना फोनदेखील केला. त्यानंतर उशीर होण्यापूर्वी सलमानला तातडीने नवी मुंबई कामाठेच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. तसेच २६ डिसेंबरच्या सकाळी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला.

सलमान खानचा उद्या २७ डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन सलमानला आपला वाढदिवस जवळचे मित्र तसेच आपल्या कुटुंबीयांसोबत साजरा करायचा होता. यावेळी फार्म हाऊसवर आपल्या मित्रांसोबत गप्पा करताना सलमानला सापाने दंश केला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!