MaharashtraPoliticalUpdate : ओबीसींचे आरक्षण जाण्याला चारही पक्ष जबाबदार : प्रकाश आंबेडकर

नागपूर : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा सुप्रीम कोर्टातील निर्णय असाच राहिला तर आता ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले . पुढे शैक्षणिक आणि नोकऱ्यातील आरक्षणही जाऊ शकते , अशी भीती त्यांनी व्यक्त करीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी, चारही पक्ष ओबीसींची फसवणूक करत आहेत. त्यामुळे ओबीसी ने स्वतःची लढाई स्वतः लढली पाहिजे, असे आवाहनही केले.
या विषयावर पुढे बोलताना ते महसुल कि , आम्ही ओबीसींच्या आरक्षणासाठी मोर्चा काढला. आता जिल्हा पातळीवर मोर्चे काढण्याची आमची तयारी सुरू आहे. आता ओबीसींना आरक्षणासाठी राजकीय भूमिका घेण्याची वेळ आली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेने आमच्याकडे मते मागायला येऊ नये असे बोर्डच ओबीसींनी आपल्य घरावर लावले पाहिजे. मत हवे असेल तर आमचे आरक्षण आम्हाला परत करा, अशी मागणी ओबीसींनी लावून धरली पाहिजे. ओबीसींना आरक्षण मिळावं आणि या लढ्याला वेग मिळावा म्हणूनच आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान मुस्लिम आरक्षाबद्दल बोलताना ते म्हणाले कि , राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांची मुस्लिम आरक्षणाबाबतची भूमिका योग्य नाही. वस्तुस्थितीला धरून नाही. मलिक यांची भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी आहे. नवाब मलिक मुस्लिमांची दिशाभूल करत आहेत. राष्ट्रवादी आणि भाजपचे संबंध जगजाहीर आहेत आणि नवाब मलिक राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत त्यामुळे ही भूमिका राष्ट्रवादीची आहे, असेही ते म्हणाले.
मराठा आरक्षणासोबतच मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण देण्याचा जीआर काढण्यात आला होता. मात्र हे प्रकरण कोर्टात गेले आहे. मात्र, मलिक हे ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेवर बोलत आहेत. ते वस्तुस्थितीला धरून नाही. मलिक यांची भूमिका संघासारखी आहे. मुस्लिमांना आरक्षण मिळू नये अशी संघाची भूमिका आहे. आता मलिकही याच बोटीतून प्रवास करताना दिसत आहे, असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.