IndiaNewsUpdate : धक्कादायक: ‘त्या ‘ हेलिकॉप्टर अपघातात बिपीन रावत यांच्यासह १३ जणांचा मृत्यू

कोईम्बतूर : तामिळनाडूच्या कुन्नूरमधील नीलगीरीच्या जंगलात भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात भारतीय संरक्षण दलांचे प्रमुख बिपीन रावत यांच्या पत्नीसह १३ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान भारताच्या आपत्कालीन परिस्थितीत तसेच चोख प्रत्युत्तर देण्यासाठी प्रसिद्ध असलेले रावत हे गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात होते मात्र या अपघातात स्वतः रावत आणि त्यांच्या पत्नीसह १३जणांचा मृत्यू झाला असल्याचे हवाई दलाने आपलट ट्विटमध्ये म्हटले आहे. आहे. रावत हे अतिशय आक्रमक आणि उंचीवरील लढायांसाठी निष्णात होते.
तामिळनाडूच्या कुन्नूरमधील नीलगीरीच्या जंगलात भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरला मोठा अपघात झाला. यामध्ये भारतीय संरक्षण दलांचे सीडीएस बिपीन रावत यांच्यासह १३ लष्करी अधिकाऱ्यांचे निधन झाले आहे. तर कॅप्टन वरून सिंग यांच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार चाली असल्याचे हवाईदलाने म्हटले आहे.
रावत यांचं पार्थिव उद्या संध्याकाळी दिल्लीत आणलं जाणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान जनरल बिपीन रावत आणि त्यांच्यासोबत इतर लष्करी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निधनावर देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. जनरल बिपिन रावत यांचं या अपघातात निधन झाल्याची माहिती भारतीय हवाई दलाकडून अधिकृत ट्विटर हँडलवर दिल्यानंतर राजधानी दिल्लीमध्ये हालचालींना वेग आला आहे. राजधानी दिल्लीमधील हालचालींना वेग आला आहे. दुपारी ३ च्या सुमारास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्लीतील जनरल बिपिन रावत यांच्या घरी जाऊन त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली. त्यापाठोपाठ लष्करप्रमुख नरवणे यांनी देखील रावत यांच्या घरीही भेट दिली. या घडामोडी घडत असताना जनरल बिपिन रावत यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
With deep regret, it has now been ascertained that Gen Bipin Rawat, Mrs Madhulika Rawat and 11 other persons on board have died in the unfortunate accident.
— Indian Air Force (@IAF_MCC) December 8, 2021
भारतीय वायुसेनेने हेलिकॉप्टर अपघातात CDS जनरल बिपिन रावत यांच्यासह १३ जणांचे निधन झाल्याचे म्हटले आहे. या हेलिकॉप्टरमधून बिपीन रावत हे वेलिंग्टनच्या डिफेंस स्टाफ कॉलेजमध्ये जात होते. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार १४ पैकी १३ जणांचा मृत्यू झाला आहे.
Gp Capt Varun Singh SC, Directing Staff at DSSC with injuries is currently under treatment at Military Hospital, Wellington.
— Indian Air Force (@IAF_MCC) December 8, 2021
हेलिकॉप्टरमधून एकूण १४ जण प्रवास करतहोते. यापैकी १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहितीहवाईदलाने दिली आहे. डीएनए चाचणीच्या मदतीने १३ मृतदेहांची ओळख पटवली गेली आहे. सीडीएस बिपिन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर दुपारी पाऊणच्या सुमारास तमिळनाडूच्या कुन्नूरमध्ये कोसळले . ग्रुप कॅप्टन पी. एस. चौहान आणि स्क्वॉड्रन लीडर कुलदीप यांच्याकडे चॉपरचं सारथ्य होते .
Indian Air Force’s Group Captain Varun Singh, injured in military chopper crash, was awarded Shaurya Chakra on this year’s Independence Day for saving his LCA Tejas fighter aircraft during an aerial emergency in 2020. pic.twitter.com/BR53FlS18M
— ANI (@ANI) December 8, 2021
चॉपरमध्ये कोण कोण होतं?
बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासोबत लष्कराचे वरिष्ठ अधिकारी होते. ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, नायक गुरुसेवक सिंग, नायक जितेंद्र कुमार, लान्स नायक विवेक कुमार, लान्स नायक साई तेजा आणि हवालदार सत्पाल अपघातावेळी हेलिकॉप्टरमध्ये होते.
एएनआयच्या वृत्तानुसार तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख जनरल बिपिन रावत प्रवास करत असलेल्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्यानंतर ते तामिळनाडूच्या कुन्नूर भागात कोसळले. अपघातामध्ये आधी ११ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण गंभीर जखमी होते मात्र, आता हेलिकॉप्टरमधील एकूण १४ व्यक्तींपैकी १३ व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. रावत यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद , संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी शॅद्धांजली अर्पण केली आहे. या अपघातासंदर्भात देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उद्या संसदेत निवेदन देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Deeply anguished by the sudden demise of Chief of Defence Staff Gen Bipin Rawat, his wife and 11 other Armed Forces personnel in an extremely unfortunate helicopter accident today in Tamil Nadu.
His untimely death is an irreparable loss to our Armed Forces and the country.
— Rajnath Singh (मोदी का परिवार) (@rajnathsingh) December 8, 2021
हवाई दलाने बिपिन रावत या दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेशही देण्यात आल्याचे हवाई दलाने सांगितले आहे. बिपिन रावत यांच्यासोबत त्यांच्या पत्नीदेखील हेलिकॉप्टरमध्ये होत्या असे सांगितले जात आहे. दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र तांत्रिक कारणामुळे दुर्घटना झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
हेलिकॉप्टरमध्ये कोण कोण होतं?
दरम्यान, बचावकार्य संपल्यानंतर जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यामध्ये सीडीएस बिपिन रावत यांचा देखील समावेश आहे. दरम्यान, हेलिकॉप्टरमधील एकूण १४ प्रवाशांपैकी १३ जणांचा मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टरमध्ये एकूण १४ जण प्रवास करत होते. त्यामध्ये जनरल बिपिन रावत यांच्याशिवाय त्यांच्या पत्नी मधुलिका रावत, ब्रिगेडियर लिडर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, नायक गुरसेवक सिंग, नायक जितेंद्र, लान्स नायक विवेक कुमार, लान्स नायक बी साई तेजा आणि हवालदार सतपाल हे प्रवास करत होते.
Around noon today, an IAF Mi 17 V5 helicopter with a crew of 4 members carrying the CDS and 9 other passengers met with a tragic accident near Coonoor, TN.
— Indian Air Force (@IAF_MCC) December 8, 2021
राजनाथ सिंह यांनी घेतली रावत यांच्या कुटुंबीयांची भेट
दरम्यान, सीडीएस बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी ६ वाजून ३० मिनिटांची कॅबिनेट कमिटी ऑन सेक्युरिटी अर्थात CCS ची महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीमध्ये बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीविषयी चर्चा करण्यात येणार असल्याचं सांगितले जात आहे. या अपघातानंतर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रावत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली. या अपघाताबद्दलची सविस्तर माहिती राजनाथ सिंह यांनी कुटुंबियांनादिली आहे.
आज सकाळी साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला. त्यासंदर्भातील बातमी दुपारी एकच्या समोर आली. त्यानंतर राजनाथ सिंह यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्येच पंतप्रधान मोदींना या अपघाताबद्दलची माहिती दिली. राजनाथ सिंह हे या अपघातासंदर्भात संसदेमध्ये सविस्तर माहिती देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आज सदेमध्ये जाण्याआधी राजनाथ सिंह दिल्लीमध्ये रावत यांच्या निवासस्थानी पोहचले. त्यांनी दहा मिनिटे रावत यांच्या नातेवाईकांशी चर्चा केली. त्यानंतर ते तेथून संसदेमध्ये गेले.