#OmicronUpdate | भारतात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा तिसरा रुग्ण…

जगभरात कोरोनाव्हायरसचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनची दहशत दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशातच भारतात गुजरातमधील जामनगरमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटचा तिसरा रुग्ण आढळला आहे. हा व्यक्ती दक्षिण आफ्रिकेतून परतला आहे. त्याचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याचे नमुने जीनोम सीक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल आज आला असून त्यात ओमिक्रॉनची लागण झाली असल्याचे आढळून आले आहे. दरम्यान, भारतातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांचा आकडा हळहळू वाढू लागल्याने भारताची देखील चिंता वाढत आहे.
भारतात या पूर्वी देखील, कर्नाटकमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटचे दोन रुग्ण आढळले होते. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली होती. कर्नाटकात आलेल्या या दोन रुग्णांपैकी एक रुग्ण ११ तारखेला तर दुसरा रुग्ण २० नोव्हेंबरला भारतात आले होते. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आता ओमिक्रॉनची लागण झाल्याचंही समोर आले आहे. या दोन जणांपैकी एकाचे वय ६६ तर दुसऱ्याचे वय ४६ आहे.