MaharashtraNewsUpdate : दोषी पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुनावणीची प्रकरणे प्रलंबित नाहीत : गृहराज्यमंत्री

औरंगाबाद : राज्याच्या गृह खात्याकडे दोषी तसेच वादग्रस्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रकरणाची कुठलीही सुनावणी प्रलंबित नसल्याची माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी महानायकशी बोलताना दिली. गृहमंत्रालयातर्फे दर १५ दिवसाला १०० ते १५० सुनावण्या होतात . त्याचे निकाल संबंधित खात्याला पाठवला जातो. पण त्यामध्ये उशीरा होत असेल तर आपण याबाबत चौकशी करू, असे स्पष्टीकरणही गृहराज्यमंत्री पाटील यांनी दिले.
ते पुध्ये म्हणाले कि , राज्यातील पोलीस कर्मचार्यांवर काही प्रकरणात गंभीर गुन्हे दाखल असतात, त्यामुळे काहींचे इन्क्रिमेंट थांबवले जातात . मी पदभार घेतल्या पासून अशा कर्मचाऱयांच्या दर दोन आठवड्याला सुनावण्या घेऊन त्याचा निकाल गृह विभागाला पाठवून देत असतो. कदाचित त्यामध्ये ऑर्डर होण्यास उशीर लागत असेल पण गृह मंत्रालयातर्फे आम्ही सुनावणीची कोणतीही प्रकरणे प्रलंबित ठेवत नाही. ही नियमित प्रक्रिया आहे . त्यामुळे आजघडीला कुठलीही प्रकरणे प्रलंबित नाहीत.