AurangabadNewsUpdate : इंधन दरवाढीवरून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या या वक्तव्याची चर्चा

औरंगाबाद : विरोधकांनी पेट्रोल- डिझेलच्या किंमतीवरुन केंद्र सरकारवर सुरु केलेली टीका लक्षात घेऊन केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी औरंगाबादेत भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांना मार्गदर्शक करताना या इंधन दरवाढीला केंद्र सरकार नव्हे तर अमेरिका जबाबदार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे.
महाराष्ट्रात शिवसेनेने आणि काँग्रेस -राष्ट्रवादीने पेट्रोल – डिझेलच्या वाढत्या किमतीवरून मोदी सरकारला धारेवर धरले आहे. या प्रश्नासाठी शिवसेनेच्या वतीने औरंगाबाद शहरात मोर्चाही काढण्यात आला. या आरोपांना उत्तर देताना दानवे बोलत होते.
आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना दानवे म्हणाले कि , ‘इंधनाच्या वाढत्या दरांवर यांनी मोर्चे काढले. पण काँग्रेसच्या काळात पेट्रोल-डिझेलच्या किंमती जागतिक बाजारपेठेशी जोडल्या आहेत. केंद्र सरकार रोज किंमती वाढवण्याचे काम करत नाही. केंद्र सरकार रोज किंमती खालीवर करत नाही. पेट्रोलचे दर अमेरिका ठरवते. त्यामुळं इंधन दरवाढीचा दोष केंद्र सरकारला देणे योग्य नाही. असं असतानाही केंद्र सरकारने आपला कर कमी केला,’ तसेच, ‘राज्य सरकार राज्यातील कर कमी करण्यास तयार नाही. हा देश केवळ केंद्र सरकारच्या पैशांवर चालतो. राज्य सरकारमधील तिन्ही पक्ष एकत्र बसून काहीही निर्णय घेत नाहीत,’ अशी टीकाही त्यांनी केली आहे.