IndiaNewsUpdate : मागासवर्गीयांची मते मिळवण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्षांनी दिला कार्यकर्त्यांना हा सल्ला !!

नवी दिल्ली : मागासवर्गीय जाती-जमातीतील मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना काही टीप्सही दिल्या असून दलितांसोबत बसून चहा-जेवण घ्या… आणि मग मतं मागा’ असे त्यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकण्यासाठी उत्तर प्रदेशात भाजपने आपले कार्यक्रम वाढवले आहेत. रविवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘ओबीसी सामाजिक प्रतिनिधि संमेलन’ आणि ‘वैश्य व्यापारी संमेलना’त बोलताना त्यांनी , दलित, मागासवर्गीयांकडे जाऊन त्यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा सल्ला कार्यकर्त्यांना दिला आहे. त्याचबरोबर ‘ आगामी विधानसभा निवडणुकीत ‘जातीवादा’च्या नाही तर ‘राष्ट्रवादा’च्या मुद्यावर मतदान करण्याचे आवाहन दलित आणि मागासवर्गीयांना करा, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. https://twitter.com/ANI/status/1459920839604797444? ‘तुमच्या नजिक राहणाऱ्या १०० दलितांच्या घरी जाऊन चहा घ्या… आणि त्यांना समजावून सांगा मतदान जातीच्या, पैशाच्या किंवा प्रादेशिकतेच्या आधारावर होत नाही… तर मतदान राष्ट्रवादाच्या नावावर होतं’, ‘दलित, शोषित आणि वंचितांच्या कमीत कमी हजार घरांत जाऊन एक चहा जरूर घ्या. जर त्यांनी तुम्हाला चहा विचारला तर याचा अर्थ आहे, त्यांच्या मनात तुमची प्रतिमा उजळ आहे. चहासोबत त्यांनी तुम्हाला जेवण्याचाही आग्रह केला तर हे कुटुंब भाजपशी जोडलं गेलेलं आहे, हे स्पष्ट होतं’ असा अर्थही स्वतंत्र देव सिंह यांनी भाजप कार्यकर्त्यांना समजावून सांगितला. जर तुम्ही एखाद्या घरी जाता आणि तिथं तुम्हाला चहाही विचारला जात नसेल तसचं तिथून निघून जाण्यसाठी सांगितलं जात असेल तर १० वेळा जाऊन तिथं चहा पिण्यासाठी प्रयत्न करत राहा. तुम्हाला हजार वेळाही जावे लागू शकते . तुमच्या दौऱ्यामुळेच पक्ष मजबूत व्हायला मदत होईल आणि तुम्हीही मोठे नेते बनाल. २०२२ मध्ये श्रीरामासाठी भाजपचे सरकार सत्तेत येणार आहे. अयोध्येत राम मंदिराचे काम पूर्ण करायचे आहे यासाठी कठोर परिश्रम करायचे आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.