MaharashtraNewsUpdate : दोन मोठ्या बातम्या : अनिल देशमुख अटकेत तर अजित पवार यांना आयटीची नोटीस

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अखेर महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांची १२ तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली होती. त्यांना मंगळवारी कोर्टात ११ वाजता हजर करण्यात येणार आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात सोमवारी हजर झाले. त्यावेळी त्यांचे वकीलही त्यांच्याबरोबर होते. यावेळी ईडीने त्यांचा जबाब नोंदवला. या प्रकरणी ईडीने देशमुख यांना आतापर्यंत पाच समन्स बजावले होते.
Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh arrested in connection with extortion and money laundering allegations against him: ED officials
(file photo) pic.twitter.com/uVLEBNk8kL
— ANI (@ANI) November 1, 2021
दरम्यान अनिल देशमुख यांच्या अटकेची बातमी आल्यानंतर आयकर विभागाने अजित पवारांना नोटीस पाठवली असल्याचे वृत्त आहे. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी अजित पवार यांच्यासहीत पवार कुटुंबावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हि नोटीस त्यांना मिळाली आहे. अजित पवारांकडे एक हजार कोटींहून अधिक बेनामी संपत्ती असल्याचे आरोप केले होते. या प्रकरणामध्ये सोमय्या यांनी अजित पवारांची आई, पत्नी आणि त्याचबरोबर पवार कुटुंबियांच्या जावयाचाही हात असल्याचा आरोप केला होता.
सोमय्या यांनी पवारांवर आरोप करताना म्हटले होते कि , मी दिवाळीनंतर बोलणार होता, पण पवार साहेबांना घाई झालीय, असे म्हणत आपण तीन जावयांचा घोटाळा समोर आणणार असे म्हणालो होतो त्याप्रमाणे आज आपण पवारांचे जावाई मोहन पाटील यांच्या मार्फत झालेल्या व्यवहारांबद्दल भाष्य केले होते . जरंडेश्वर साखर कारखान्याच्या माध्यमातून अजित पवारांच्या खात्यात शेकडो कोटी आलेत. हे पैसे बिल्डरांनी दिले आहेत. हे सर्व सर्व त्यांनी कुटुंबियांच्या खात्यात वळवल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय. ए. ए. पवार यांच्याबरोबरच अजित पवार यांनी स्वत:च्या आईच्या खात्यातही हे पैसे वळवले आहेत. मोहन पाटील, विजया पाटील, सुनेत्रा पवार यांचे सगळे काळे कारभार तिकडून होतात असेही सोमय्या म्हणाले.
पवार हे नवाब मलिकांना आता पुढे करत आहेत
पवार कुटुंबियांविरोधात होणाऱ्या आयकरच्या कारवाईपासून लक्ष्य विचलित करण्यासाठी शरद पवार हे नवाब मलिकांना आता पुढे करत असल्याचेही सोमय्या म्हणाले आहेत. वानखेडेंच्या पहिल्या लग्नाच्यावेळी ते का गप्प बसले?, सेवेत आले तेव्हा का गप्प बसले?, असा प्रश्न सोमय्या यांनी मलिक यांना विचारला आहे. पवार परिवाराने महाराष्ट्राला खूप लुटलेय, असेही सोमय्या यांनी म्हटले आहे. नवाब मलिक रोज उठून दाऊद दाऊद करतात कारण हे नाव त्यांना अत्यंत जवळचे आहे, असा टोलाही सोमय्या यांनी लगावला होता.