हिंमत असेल तर शहराची नावे बदलून दाखवाचं… इम्तियाज जलील यांचे आव्हान

औरंगाबाद मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून शहराच्या नामांतरचा विषय राज्यात मोठ्या प्रमाणात सुरु आहे. तसेच काही दिवसांपुर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटमध्ये ‘संभाजीनगर’ असा उल्लेख केला होता. अनेक पक्ष संभाजीनगर नामांतर करण्यासाठी आग्रही भूमिका घेत आहेत. मात्र, आता एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी संभाजीनगर नावावरून शिवसेनेला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.
इम्तियाज जलील यांनी आव्हान केले आहे. हिंमत असेल तर शहराची नावे बदलून दाखवाचं, दरम्यान, राज्य शासनाच्या एका परिपत्रकात औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यावरून इम्तियाज जलील यांनी ज्या अधिकाऱ्यांनी हे परिपत्रक काढले आहे त्या अधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. शिवसेनेकडून औरंगाबाद नामांतरावर आग्रही भूमिका मांडण्यात आली होती. मात्र, महाविकास आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसने नामांतराला विरोध दर्शवला होता. त्यानंतर मात्र नामांतराचा विषय मागे पडला. त्यातच आता पुन्हा एकदा नामांतराचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आगामी औरंगाबाद महापालिका निवडणुकीवरून नामांतराचा मुद्दा चर्तेत येऊ शकतो. आता एका सरकारी परिपत्रकात संभाजीनगर असा उल्लेख केला गेला. यावरून इम्तियाज जलील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपकडूनही संभाजीनगर असे नामांतर करण्यात यावे, अशी भूमिका मांडली जात आहे. आता या वादावरून राजकीय पक्ष भविष्यात काय पवित्रा घेणार आहेत, हे पाहण महत्त्वाचे ठरणार आहे.