राज ठाकरे यांचे दौरे स्थगित…

Advertisements
Advertisements
Spread the love

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींना कोरोनाची लागण झाली आहे. राज ठाकरेंना करोनाची सौम्य लक्षणं जाणवत होती. त्यांनी आणि त्यांच्या मातोश्रींनी करोनाचे दोन्ही डोस घेतले आहेत. मात्र, त्यानंतर देखील त्यांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे.पालिकेकडून राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजवर सॅनिटायझेशन केलं जाण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर घरीच क्वारंटाईन होऊन उपचार केले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Advertisements

राज ठाकरेंना बरं वाटत नसल्यामुळे मुंबईत होणारा मनसे कार्यकर्ता मेळावा पुढे ढकलण्यात आला होता. मात्र, आता राज ठाकरेंना करोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांना करोनाची प्राथमिक लक्षणे आढळून आली. त्यामुळे चाचणी केली असता त्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या कुटुंबातील व घरातील इतर सदस्यांच्या चाचणीविषयी किंवा त्यांच्या अहवालांविषयी अद्याप माहिती मिळाली नाही. मात्र, राज ठाकरे आणि त्यांच्या आईंना करोनाची लागण झाली असून इतर सदस्यांपासून त्यांनी घरातच विलगीकरण करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका जवळ आल्याने सर्वच पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत. राज ठाकरे हेदेखील विविध शहरांचे दौरे करत आहेत. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे आगामी काही दिवसांतील त्यांचे दौरे स्थगित करण्यात आले आहेत.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!