CoronaMaharashtraUpdate : नव्या कोरोनाबाधितांपेक्षा ब-या होणा-या रुग्णांची संख्या वाढली

मुंबई : गेल्या २४ तासात राज्यात २ हजार ९६८ रूग्ण कोरोनामधून बरे झाले असून, १ हजार ५७३ नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. याचबरोबर ३९ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. दरम्यान मुंबई, पुणे या सारख्या मोठ्या शहरात तर आता दिवसभरात कोरोनामुळे एकाही रूग्णांचा मृत्यू झाला नसल्याची देखील नोंद झालेली आहे.
आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आजपर्यंत एकूण ६४,३०,३९४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.४६ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,९८,२१८ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १३९९२५ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,१४,९४,०९० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,९८,२१८ (१०.७३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,०१,१६२ व्यक्ती गृह विलगीकरणात आहेत तर १००७ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात आज रोजी एकूण २४,२९२ सक्रिय रुग्ण आहेत.