MumbaiNCBNewsUpdate : नवाब मलिक यांचे वानखेडे यांच्यावर पुन्हा आरोप तर वानखेडेंचे प्रत्युत्तर …

मुंबई : एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखडे यांची बोगसगिरी चव्हाट्यावर आणण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी दिला आहे. वर्षभरात तुझी नोकरी जाईल आणि तुझा तुरुंगवास निश्चित आहे, असे जाहीर आव्हानच त्यांनी समीर वानखडे यांना दिले आहे. दरम्यान मलिक यांनी केलेले हे सर्व आरोप फेटाळून लावत समीर वानखेडे यांनीही पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली आहे.
मलिक यांनी समीर वानखडेवर नवाब मलिकांनी अत्यंत कडक भाषेत टीका केली आहे. वानखडेचा बोगस कारभार पूर्णपणे बोगस असून त्याचा बाप आणि घरातले सगळे बोगस असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आपल्या जावयाला तुरुंगात टाकले आणि आता आपल्याला तो फोन करत आहे. यात आपला काहीच हात नसल्याचे तो सांगतो. असे असेल, तर हे बोगस प्रकार तू कुणाच्या सांगण्यावरून करतो आहेस, याचे उत्तर दे, असे आव्हान मलिक यांनी वानखडे यांना दिले आहे.
दरम्यान आपण तुझ्या बापाला घाबरत नसून तुझा कोण बाप आहे, ते मला सांगच, असे म्हणत मलिकांनी वानखडे यांना खडे बोल सुनावले आहेत. समीर वानखडेला तुरुंगात टाकल्याशिवाय आपण गप्प बसणार नसल्याचा इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे. वर्षभरात समीर वानखडेची नोकरी जाईल आणि त्याचे सत्य महाराष्ट्रासमोर येईल, असे आव्हान त्यांनी दिले आहे.
क्रूझ ड्रग्ज प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीवर निशाणा साधला आहे. यापूर्वीदेखील त्यांनी समीर वानखडे यांच्यावर आरोप केले होते. सुशांत सिंग केसमध्ये रिया चक्रवर्तीवर आणि इतर बॉलिवूड कलाकारांवर खोट्या केस दाखल केल्याचा आरोप त्यांनी केला होता. तर त्यापूर्वी भाजप आणि एनसीबी एकमेकांच्या साथीनं मुंबईत आतंकवाद पसरवत असल्याचा आरोप त्यांनी बुधवारी केला होता.
मलिक यांनी केलेल्या आरोपाचे खंडन
दरम्यान ‘नवाब मलिक यांनी माझी आई, वडिल आणि बहिणीवर चुकीचे आरोप केले असून मी या आरोपांचं खंडन करतो. ते सांगत असलेल्या तारखेला मी दुबईला गेलेलो नव्हतो. ते खूप मोठे मंत्री आहेत. त्यांना लोकांचा अपमान करण्याचा अधिकार असू शकतो, मात्र मी खूप लहान सरकारी कर्मचारी आहे. मी माझं काम करत आहे. जर देशाची सेवा करण्यासाठी आणि अॅण्टी ड्रग्ज ऑपरेशन करण्यावरुन जेलमध्ये टाकत असतील तर मी त्याचं स्वागत करतो,’ असं वानखेडे यांनी म्हटलं आहे. माझ्या बहिणीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर जाऊन त्यांनी हेरगिरी केली आहे, असा आरोपही समीर वानखेडे यांनी केला आहे.