रामायण मालिकेतील ‘रावण ‘ फेम अरविंद त्रिवेदी यांचे निधन झाले

मुंबई : ‘रामयण’ या प्रसिद्ध मालिकेत रावणाची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८२ वर्षी त्यांनी आखेरचा श्वास घेतला. अरविंद अनेक वर्षांपासून आजारी होते असे सांगितले जाते. काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. ही बातमी त्यांचा भाच्चा कौसतुब याने दिली. या बातमीने संर्पूण इंडस्ट्रीला खूप मोठा धक्का बसला आहे. कलाविश्वातील सर्वजण सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
आध्यात्मिक रूप से रामावतार का कारण और सांसारिक रूप से एक बहुत ही नेक,धार्मिक, सरल स्वभावी इंसान और मेरे अतिप्रिय मित्र अरविंद त्रिवेदी जी को आज मानव समाज ने खो दिया। नि:संदेह वे सीधे परमधाम जाएंगे और भगवान श्रीराम का सानिध्य पाएंगे।🙏💐
— Arun Govil (@arungovil12) October 6, 2021
आरविंद यांनी ३०० हून अधिक हिंन्दी आणि गुजराती चित्रपटात काम केले आहे रामयाणातील रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांनी ट्वीट करत लिहिले, “आध्यात्मिक रुपाने रामावतारचे कारण आणि सांसारिक रुपात एक खूपचं चांगले, धार्मिक, सध्या स्वभावाचे मनुष्य आणि माझा खूप जवळचा मित्र अरविंद त्रिवेदी हे आज आपल्याला सोडून गेले आहेत. अर्थात ते थेट सर्वोच्च निवासस्थानी जातील आणि त्यांना श्री रामाचा सहवास लाभेल.”
दरम्यान सुनील लहरी यांनी आरविंद यांचे दोन फोटो शेअर करत ट्वीट केले, “‘अत्यंत दुःखद बातमी आहे की, आमचे लाडके अरविंद भाई (रामायणाचे रावण) आता आपल्यात नाही. त्याच्या आत्म्याला शांती लाभो … माझ्याकडे शब्द नाहीत, मी एक वडील, माझा मार्गदर्शक, हितचिंतक आणि एक सज्जन मनुष्य गमावला आहे.
Bahut dukhad Samachar hai ki Hamare Sabke Pyare Arvind bhai (Ravan of Ramayan) Ab Hamare bich Nahin Rahe😥 Bhagwan Unki Atma ko Shanti De…I am speechless I lost father figure, my guide, well wisher & gentleman … 🙏😥 pic.twitter.com/RtB1SgGNMh
— Sunil lahri (@LahriSunil) October 6, 2021