MumbaiNewsUpdate : क्रूझवर रेव्ह पार्टी प्रकरण , आर्यनसह दोघांना ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडीत ठेवण्याचे आदेश

मुंबई : मुंबई ते गोवा प्रवासादरम्यान क्रूझवर रेव्ह पार्टी सुरू असताना एनसीबीने टाकलेल्या छाप्यात प्रसिद्ध अभिनेता शाहरुखचा मुलगा आर्यन खानला पोलिसांनी अटक करून आज न्यायालयात हजर करण्यात आले आहे. आर्यनसोबत अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा सुद्धा अटकेत आहे. दरम्यान आजच्या कोठडीत वाढ करून अधिक चौकशी करण्यासाठी आर्यन खानसह अन्य आरोपींंची कोठडी ११ ऑक्टोंबरपर्यंत वाढवण्याची मागणी एनसीबीने किल्ला न्यायालयासमोर केली आहे. यावेळी दोन्हीही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद चालू आहे. दरम्यान दोनीही वकिलांच्या युक्तिवादानंतर आर्यन खानसह सर्व आरोपींना ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
यावेळी एनसीबीचे वकील अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी आपल्या युक्तिवादात म्हटले आहे कि , आर्यन खानसह तिन्ही आरोप नेहमी एका ड्रग्स तस्काराकडून ड्रग्स घेत होते. आरोपीच्या मोबाईलमधून ड्रग्ससंद्रभातील चॅट सापडले आहे. यृत्यामधून धक्कायदायक माहिती पुढे आली असून काही जणांची नावे देखील समोर आली आहेत. त्यांची चौकशी करणे गरजेचे आहे. आरोपी हे विदेशातील नागरिकांच्या संपर्कात असून त्यांची चौकशी करणे गरजेचे आहे.” त्यामुळे एनसीबीकडून तिन्ही आरोपींचा एनसीबी कोठडी मागण्यात आली आहे.
Mumbai | All accused arrested yesterday following NCB raid on a cruise ship off Mumbai coast brought to a city court pic.twitter.com/LgW93ZdyuN
— ANI (@ANI) October 4, 2021
त्यावर आरोपींचे वकील सतीश मानेशिंदे यांनी म्हटले आहे कि , आर्यनला पार्टीसाठी निमंत्रण दिले होते . आर्यन कुठल्याही ड्रग्स तस्करांच्या संपर्कात नव्हता. आर्यनकडे काहीही सापडलेले नाही. केवळ चॅटच्या आधारे कोठडी मागता येणार नाही . आरबाज त्याचा मित्र असून दोघेही एकमेकांना ओळखतात परंतु आर्यनकडून ड्रग्ज खरेदी आणि विक्रीबाबत काही पुरावे एनसीबीला मिळालेले नाहीत. तसेच कुठल्याही ड्रग्ज तस्कराशी आर्यनचे काहीही संबध नाहीत. आर्यनने ड्रग्स ख रेदी केलेलं नाही. तसेच त्याला ड्रग्सचे व्यसनही नाही. शिवाय एनसीबीने घेतलेल्या झडतीत आर्यनच्या बॅगमध्ये काहीही आक्षेपार्ह आढळलेले नाही.