CoronaMaharashtraUpdate : कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट , बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ

मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात ३ हजार ०६३ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या ३ हजार १८७ इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण ३ हजार १९८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ३ हजार २५३ इतकी होती. तर, आज ५६ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या ४९ इतकी होती.
आज राज्यात झालेल्या ५६ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवरच स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ७१ हजार ७२८ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२७ टक्के इतके झाले आहे.
दरम्यान आज राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३६ हजार ४८४ इतकी आहे. काल ही संख्या ३६ हजार ६७५ इतकी होती. या बरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा ९ हजार ३९६ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात ही संख्या ६ हजार १९६ आहे. अहमदनगरमध्ये ही संख्या ५ हजार ०५९ अशी वाढली आहे. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या २ हजार ०८३ वर आहे. तर, सांगलीत एकूण १ हजार ११९ आहे. तसेच, सोलापुरात ही संख्या १ हजार ३६१ इतकी आहे.
सध्या मुंबईत ५,१८३ रुग्ण उपचार घेत असून मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांच्या संख्या ५ हजार १८३ इतकी आहे. तर, रत्नागिरीत ६३६ इतकी आहे आहे, सिंधुदुर्गात ६७२, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ८७४ इतकी खाली आली आहे. तर भंडारा जिल्ह्यात सर्वात कमी सक्रिय रुग्ण असून या बरोबरच, औरंगाबादमध्ये ४००, नागपूर जिल्ह्यात ही संख्या १०४ इतकी आहे. अमरावतीत ही संख्या १०९ वर आली आहे. तर धुळ्यात ३ आणि भंडाऱ्यात सर्वात कमी म्हणजेच २ सक्रिय रुग्ण आहेत.
दरम्यान आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ८७ लाख ३९ हजार ९७४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख ५० हजार ८५६ (११.१५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ४५ हजार ४२७ व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत. तर, १ हजार ४२३ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.