MaharashtraPoliticalUpdate : मोठी बातमी : महापालिका ३ प्रभागावर बुधवारी होऊ शकतो फेरविचार !!

पुणे : राज्यातील महापालिका निडणुकीच्या संदर्भात मुंबई वगळता राज्यातील इतर महापालिकांमध्ये तीन प्रभागावर आधारित निवडणूक घेण्याच्या निर्णयात बदल होऊ शकतो असे संकेत काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले असल्याचे वृत्त आहे. सरकारच्या या निर्णयावरून मनसे नेते राज ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांनी तीवर प्रतिक्रिया दिल्या होत्या.
दरम्यान ‘तीन सदस्यांचा प्रभाग हा कॅबिनेटचा निर्णय असून कोणत्याही पक्षांचा विषय नाही तरीही काही मतमतांतरे असतील येत्या बुधवारी यासंदर्भात फेरविचार होऊ शकतो’ असे असे थोरात यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, राज्यावर विजेचे संकट असले तरी राज्य आम्ही अंधारात जाऊ देणार नाही, आम्ही सक्षम आहोत. विज बीलाची थकबाकी हे वास्तव आहे. त्यामुळे कोळसा खरेदीत अडचणी येत आहेत पण तोही प्रश्न मिटेल, असेही थोरात यांनी सांगितलं.
विशेष म्हणजे, तीन प्रभाग रचनेबवरून महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही वाद नाही. मात्र तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेहे यावर नक्कीच तोडगा काढतील. दरम्यान प्रभाग ३ चा असावा की २ चा असावा हे मुख्यमंत्रीच ठरवतील, असे अजित पवार यांनीही आधीच स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर, बुधवारच्या कॅबिनेटमध्येच प्रभाग निश्चितीवर अंतिम निर्णय होईल. महाविकास आघाडी सरकारमधील काही घटकांनी वेगळी मतं नोंदवली. त्यावर सीएम सर्वमान्य तोडगा काढतील, आमच्यात कोणतेही वाद नाहीत, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले होते.