4 ऑक्टोबरपासून शाळेची घंटा पुन्हा वाजणार…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार आता ग्रामीण भागात पाचवी ते बारावी तर शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरु होणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. शाळा सुरु करण्याअगोदर शिक्षक आणि पालकांना प्रशिक्षण देणार असल्याचंही गायकवाड यांनी सांगितलं आहे.
पुरणाचा प्रादुर्भाव लक्षात घेत, आधी कोरोनामुक्त झालेल्या ठिकाणी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, टास्क फोर्ससोबत चर्चेनंतर आता ग्रामीण भागात पाचवी ते 12 आणि शहरी भागात आठवी ते 12 वी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. शाळा सुरु करण्याअगोदर आजारी मुलांना कसं शोधायचं? त्याच्या संदर्भात टास्क फोर्स ट्रेनिंग देणार आहे. यासोबतच पालकांनी काय काळजी घ्यायची या संदर्भातही आम्ही माहिती देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.