MaharashtraPoliticalUpdate : चंद्रकांत पाटील यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती, मुश्रीफ यांचा गौप्यस्फोट

मुंबई : भाजपनेते किरीट सोमय्या यांनी गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्याचा धडाका लावला आहे. त्यातच पोलिसांनी त्यांना पॉलिसी खाक्या दाखवताच सोमय्या आणि भाजप नेते साकारवार चांगलेच तोंडसुख घेत आहेत . या सर्व गदारोळात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्यावर आरोपांचे खंडन करताना सोमय्या आणि भाजप नेत्यांवर टीका केली आहे.
यावेळी बोलताना मुश्रीफ म्हणाले, किरीट सोमय्यांच्या आरोपामागे भाजपचे षडयंत्र आहे. त्याचे आरोप खोटे व बिनबुडाचे असून त्यामागे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सूत्रधार आहे, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. तसंच, चंद्रकांत पाटील यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट मुश्रीफांनी केला आहे. मला सोमय्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही एकदा तक्रार केली आहे. मग त्या तपास यंत्रणा तपास करतील की, तुम्ही कशाला पर्यटन करायला जाता? तुरुंगात टाकणार, घोटाळेबाज असे म्हणण्याचा अधिकार यांना कोणी दिला? यावर आक्षेप घेत मी उच्च न्यायालयात जाणार आहे. हे न्यायाधीश झाले का? तुम्हाला सुपारी दिलीय तर तुम्ही तुमचे काम करा , तक्रार करा. तपास यंत्रणांना तपास करु द्या. तुम्ही बदनामी का करत आहेत?
शरद पवारांचा काय संबंध ?
तसेच आपल्यावरील आरोपांना उत्तर देताना मुश्रीफ म्हणाले कि , आमच्यावरआत्तापर्यंत एकही घोटाळ्याचा आरोप झालेला नाही. महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचा हा प्रयत्न आहे, ते होणार नाही. शरद पवारांचा काय संबंध आहे ह्यात? त्यांचे नाव का घेताय ? त्यांचे नाव घ्यायची लायकी आहे का? उद्धव ठाकरेंचे नाव घेताहेत हे. हे बोलण्यापासून त्यांना रोखण्यासाठी मी उच्च न्यायालयात जाणार आहे.
‘मी १०० कोटीचा दावा ठोकणार आहे, तो दावा तयार होत आहे. आजच्या कथित घोटाळ्याबाबत केलेला आरोप इतका बिनबुडाचा आहे की सोमय्यांच्या सीएची पदवी शंकास्पद आहे. सोमय्यांनी अभ्यास करावा. मी सीए पाठवतो, ते पाहून घ्या,’ असा टोला मुश्रीफांनी लगावला आहे. तसेच, ‘ब्रिक्स इंडिया कंपनीशी माझा आणि माझ्या जावयांचा सूतराम संबंध नाही, असे स्पष्ट करतानाच मी सगळे डॉक्युमेंट काढले, ब्रिक्स इंडिया कंपनी ही ४४ लाख कॅपिटलची कंपनी आहे, ही शेल कंपनी नाही, त्याचे शेअर कॅपिटल १ लाख आहे, मग १०० कोटीचा घोटाळा कसा होईळ? २०१२-१३ मध्ये हा कारखाना शासनाने ब्रिक्स फॅसिलिटीला चालवायला दिला होता १० वर्षासाठी सहयोगी तत्वावर. ते म्हणतात २०२० ला दिला,’ असे मुश्रफांनी म्हटले आहे.
भाजप नेत्यांच्या फायली ओपन करा – नाना पटोले
दरम्यान, या प्रकरणावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे कि , ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा स्वभाव गंमत करण्याचा आहे. त्यांच्या पद्धतीने ते बोलले. पण भाजप नेत्यांना दिवसा सत्तेची स्वप्न पडत आहेत. महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे चालेल. यात कोणतीची शंका आमच्या मनात नाही. फडणवीस सरकारच्या काळातील काही फाईली काढण्याची वेळ झाली आहे. चंद्रकांत पाटील यांनी स्वत: खाल्ले पण दिसू दिले नाही. किती खाल्ले तेही सांगून टाकावे. ‘रविवारी अनंत चतुर्दशी असताना स्टंटबाजी करुन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न भाजपने केला. माध्यमं असो, उद्योगपती असो किंवा राजकीय नेते यांवर आरोप करुन ब्लॅकमेल करण्याचे काम भाजप ककरीत आहे. कारण तसा अधिकारच केंद्रातील ब्लॅकमेलिंग सरकारने त्यांना दिला आहे’ अशी टीकाही पटोले यांनी केली.