AurangabadNewsUpdate : मुख्यमंत्री होणार का ? यावर खा. सुप्रिया सुळे यांनी दिले असे उत्तर !!

औरंगाबाद : काल रात्रीपासून आज दिवसभर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्यात मोठी खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर त्यांनी केलेल्या आरोपांमुळे राज्याचे राजकारण चांगलेच पेटले आहे. या वादात उडी घेताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी , ‘ केंद्रीय यंत्रणा चलन फाडणाऱ्या पोलिसांसारखे वाटत आहेत. किरीट सोमय्या हे सीबीआयचे प्रमुख आहेत का, की ईडीचे डायरेक्टर आहेत ? असे प्रश्न उपस्थित करीत भाजपवर टीका केली. सध्या सुप्रिया सुळे या औरंगाबादच्या दौऱ्यावर आल्या आहेत. यावेळी पत्रकार परिषद घेऊन सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणात आपली भूमिका मांडली.
पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या कि , ‘केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर होत आहे. आणि हे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. किरीट सोमय्या हे का. सीबीआय प्रमुख आहेत का किंवा ईडीचे डायरेक्टर आहेत का? केंद्रीय यंत्रणा चलन फाडणाऱ्या पोलिसांसारखे वाटत आहेत. यांच्यातून काही निघणार नाही, मात्र आम्ही लढत राहणार आहोत. सत्य कधी पराजित होत नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात. यावेळी पत्रकारांनी तुमची मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का, असा सवाल विचारला असता, त्या म्हणाल्या की, ‘जेंडर ट्रॅपमध्ये अडकायचे नाही. चांगले काम करणारा व्यक्ती मुख्यमंत्री असावी .
यावेळी बोलताना त्यांनी पत्रकारितेवरही भाष्य केले . त्या म्हणाल्या कि , ‘पत्रकारितेवर बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे दूरगामी परिणाम दिसत आहेत. बातम्यांची सत्यता पडताळली जात नाही किंवा इतरांचा विचार किंवा खरे खोटेपणा तपासला जात नाही. समाज उपयोगी बातम्या निर्दयपणे कापल्या जातात. उथळ बातम्यांमुळे आमदार खासदार यांच्याबद्दल समाजात वाईट प्रतिमा निर्माण होते. माझ्या आतापर्यंत वादग्रस्त मोठ्या बातम्या झाल्या नाहीत. पुढेही होऊ देणार नाही अशी देवाकडे प्रार्थना.