PanjabPoliticalUpdate : सर्वानुमते झाली निवड , पंजाबचे नवे मुख्यमंत्री म्हणून चरणजीत सिंग चन्नी उद्या घेणार शपथ , चन्नी मागास समाजातील पहिले मुख्यमंत्री

चंदीगड : प्रचंड वादविवाद आणि आज दिवसभराच्या चर्चेनंतर पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरीश रावत यांनी ट्विट करून हि माहिती जाहीर केली. आज दिवसभर चाललेल्या बैठकीनंतर चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावावर काँग्रेस हायकमांडकडून शिक्कामोर्तब करण्यात आले. विशेष म्हणजे ५८वर्षीय चन्नी हे पंजाबचे पहिले मागास समाजातील मुख्यमंत्री आहेत. दरम्यान पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी सुखजिंदरसिंग रंधावा, नवज्योतसिंग सिद्धू, सुनिल जाखड यांच्या नावांची चर्चा होती. त्यात सर्वाधिक चर्चेत सुखजिंदरसिंग रंधावा यांचं नाव होतं. मात्र, या सर्व नेत्यांच्या सर्वसंमतीने चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. चन्नी हे उद्या सकाळी ११ वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे.
"We have presented our stance, unanimously supported by party MLAs, before the Governor. Oath taking ceremony to take place at 11 am tomorrow," says Punjab CM-designate Charanjit Singh Channi pic.twitter.com/Ksh9YnGYpm
— ANI (@ANI) September 19, 2021
चरणजीत सिंग चन्नी यांनी घेतली राज्यपालांची भेट
मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर चरणजीत सिंग चन्नी यांनी राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांना आपण आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र दिलं. आपली विधिमंडळ पक्ष नेतेपदी एकमाताने निवड झाली आहे. आपली भूमिक राज्यपालांकडे माडंत सरकारच्या स्थापनेचा दावा, असं चन्नी यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर सांगितलं. तसंच उद्या सकाळी ११ वाजता आपला शपधविधी होणार आहे, असं ते म्हणाले. राज्यपालांच्या भेटीवेळी चन्नी यांच्यासोबत पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धूही होते. चन्नी हे सिद्धू यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी अमरिंदर सिंग यांच्याविरोधात दंड थोपटले होते. चन्नी यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सीमेपलिकडील सुरक्षेचा वाढता धोका लक्षात घेता होणारे मुख्यमंत्री चन्नी हे सीमेची आणि पंजाबच्या जनतेची सुरक्षा करतील अशी अपेक्षा आहे, असं अमरिंदर सिंग म्हणाले.चरणजीत सिंग चन्नी यांच्या घराबाहरे त्यांच्या समर्थकांनी नाचत आनंद साजरा केला.
Congratulations to Shri Charanjit Singh Channi Ji for the new responsibility.
We must continue to fulfill the promises made to the people of Punjab. Their trust is of paramount importance.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 19, 2021
राहुल गांधी यांनी केले चरणजीत सिंग चन्नी यांचे अभिनंदन
दरम्यान, मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चरणजीत सिंग चन्नी यांचे अभिनंदन केले आहे. “पंजाबच्या जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करूया. जनतेचा विश्वास सर्वोच्च आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. चरणजीत सिंह चन्नी यांची निवड जाहीर होताच मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेतील प्रबळ दावेदार सुखजिंदर सिंग रंधावा यांनी आपली प्रतिक्रिया देताना “हा हायकमांडचा निर्णय असून मी त्याचे स्वागत करतो. चन्नी माझ्या लहान भावासारखे आहेत. मी अजिबात निराश नाही,” असे म्हटले आहे. राज्यात अकाली दल आणि भाजपाची सत्ता असताना चन्नी विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. ते चमकौर साहिब मतदारसंघाचे आमदार असून त्यांनी मंत्री म्हणून तांत्रिक शिक्षण आणि औद्योगिक प्रशिक्षण, रोजगार निर्मिती आणि प्रशिक्षण आणि पर्यटन आणि संस्कृती व्यवहार विभागाची जबाबदारी सांभाळली होती. तसेच पक्षाच्या नेत्यांनी मांडलेल्या मुद्द्यांकडे माजी मुख्यमंत्री लक्ष देत नाहीत म्हणून त्यांनी अमरिंदर सिंग यांच्या विरोधात आवाज उठवला होता.
It's high command's decision…, I welcome it. Channi is like my younger brother…I am not at all disappointed…: Congress leader Sukhjinder Singh Randhawa, after announcement of Charanjit Singh Channi as new Punjab Chief Minister pic.twitter.com/jHbAHapQEH
— ANI (@ANI) September 19, 2021
सिद्धूंच्यी सहमतीने चन्नींची निवड
दरम्यान पंजाबमध्ये नवे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नींच्या मंत्रिमंडळात आता दोन उपमुख्यमंत्रीदेखील केले जातील असे पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत यांनी म्हटले आहे. एनडीटीव्हीशी बातचीतदरम्यान ही माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, पंजाबमध्ये दोन उपमुख्यमंत्रीही बनवावे अशी अनेक नेत्यांची इच्छा होती. त्यांच्या इच्छेनुसार, आता राज्यात दोन उपमुख्यमंत्री असतील. पण, अद्याप या दोन्ही नावांवर चर्चा झालेली नाही. सर्वात आधी सोमवारी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री शपथ घेतील, त्यानंतर कॅबिनेट मंत्र्यांचा निर्णय घेतला जाईल. चरणजीत सिंग चन्नींच्या निवडीबाबत बोलताना ते म्हणाले कि , चन्नींच्या नावावर पक्षातील प्रत्येकजण सहमत आहे. चरणजीत सिंग चन्नी यांचे नाव नवज्योतसिंग सिद्धू यांच्या समतीनेच ठरवण्यात आले असून आपण माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचीही भेट घेणार आहोत.
अमरिंदर यांच्या चन्नींना शुभेच्छा
पंजाबचे मावळते मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अमरिंदर सिंग यांनी काल नवज्योतसिंग सिद्धू यांच्या विरोधात टीका केली होती मात्र चरणजीत सिंग चन्नी यांची ना पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्याचे समजताच त्यांनी चन्नी यांना त्यांच्या निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, चन्नींनी राज्याची सीमा आणि पंजाबच्या लोकांचे रक्षण करावे, असे मतही व्यक्त केले आहे.
पडद्यामागे काय झाले ?
गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्री अमरिंदर सिंह आणि नवजोत सिद्धू यांच्यात बराच वादविवाद चालू होता. दरम्यान शुक्रवारी काँग्रेसच्या व्हिमंडळ पक्षाची तातडीची बैठक झाल्यानंतर नेतृत्व बदलाच्या हालचाली अधिक गतिमान झाल्या. दरम्यान पक्षाच्या ८० पैकी ५० आमदारांनी काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांना पत्र लिहून अमरिंदर सिंह यांना बदलण्याबाबत पत्र लिहिले. त्यामुळे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी स्वतःवर संयम ठेवत अखेर राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
आज दुपारी झालेल्या बैठकीत सुखजिंदर रंधावा यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे आल्यानंतर काही आमदारांनी त्यांच्या नावाला विरोध झाला. त्यामुळे काही वेळापुरती बैठक थांबवून पुन्हा घेण्यात आली. त्यानंतर मात्र जेंव्हा चरणजीत चन्नी यांचे नाव पुढे आले तेंव्हा सर्वांनीच त्यांच्या नावाला संमती देण्यात आली . आता होणाऱ्या नेता निवडीत कोणतेही वादविवाद नकोत अशी काँग्रेस नेत्यांची इच्छा होती आणि नावाचा हा तिढा सुटला. आणि ज्येष्ठ नेते सुखजिंदर रंधावा यांनीही चन्नी यांच्या नावाला पाठिंबा दिला आणि या वादावर पडदा पडला.