CoronaMaharashtraNewsUpdate : दिलासादायक : कोरोनमुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ

मुंबई : आज दिवसभरात राज्यात ३ हजार ४१३ नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून, ८ हजार ३२६ रूग्ण कोरोनामधून बरे झाले आहेत. तर, ४९ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद देखील झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६३,३६,८८७ कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण(रिकव्हरी रेट) ९७.१६ टक्के एवढे झाले आहे. राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या ६५,२१,९१५ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १३८५१८ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.१२ टक्के आहे.
दरम्यान दररोज आढळणाऱ्या नवीन करोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होत असलेल्यांची संख्या आज दुपटीहून अधिक आढळून आली आहे. ही संख्या आतापर्यंत कधी कोरोनाबाधितांपेक्षा कमी तर कधी जास्त आढळून येत होती. मात्र आज हे प्रमाण दुपटीहून अधिक आढळून आले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,७०,२८,४७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,२१,९१५ (११.४४टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,८१,५६१ व्यक्ती गृहविलगिकरणात आहेत, तर १ हजार ७५२ व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणात आहेत. राज्यात आज रोजी एकूण ४२,९५५ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.
Maharashtra reports 3,413 new #COVID19 infections, 8,326 recoveries and 49 deaths today.
Total cases: 65,21,915
Total recoveries: 63,36,887
Death toll: 1,38,518Active cases: 42,955 pic.twitter.com/l8UtJB2Lre
— ANI (@ANI) September 19, 2021