AurangabadNewsUpdate : धनादेश अनादर प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात शिक्षिकेची निर्दोष मुक्तता

औरंगाबाद : ठरल्याप्रमाणे हात उसनी रक्कम रु ७ लाख न देता केवळ सुरक्षेसाठी म्हणून दिलेल्या धनादेशाचा गैरवापर करून आपल्या शिक्षिकेलाच फसवल्याच्या प्रकरणात न्यायालयाने आरोपी शिक्षिकेला दिलेली शिक्षा रद्द करून निर्दोष मुक्त केले. जिल्ह्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉ. एम. एस देशपांडे यांनी हा निकाल दिला. या प्रकरणात आरोपी शिक्षिका यांना न्यायालयाने ३ महिने कारावासाची शिक्षा व रु ९ लाख रुपये दंड केला होता
या खटल्याची थोडक्यात माहिती अशी की, सुनीता मोहन कोरडे या गेल्या गेल्या २० वर्षांपासून फिनिक्स इंग्लिश स्पिकिंग कोर्सच्या नावाने क्लास चालवतात. सदर क्लासमध्ये मुकुंद विश्वनाथ जाधव , रा बजाज नगर औरंगाबाद हा इंग्रजी शिकण्यासाठी येत होता. दरम्यान मुकुंद विश्वनाथ जाधव याने कसल्याही प्रकारे आरोपी महिला शिक्षिकेस रु ७ लाख दिलेले नसताना सुनीता कोरडे यांच्याकडून केवळ सुरक्षेसाठी धनादेश घेतला होता . सदर धनादेश सुरक्षेसाठी असल्याने वटविण्यासाठी टाकू नये अशी विनंती देखील सुनीता कोरडे यांनी नोटीसद्वारे केली होती. परंतु त्यावरही फिर्यादी मुकुंद जाधव याने धनादेशाचा गैरवापर करून सुनीता कोरडे यांच्याविरुद्ध अनादरीत धनादेशाची कारवाई दाखल केली.
सदर खटल्यामध्ये कनिष्ठ न्यायालयाने आरोपी सुनीता कोरडे यांना तीन महिने कारावासाची शिक्षा व रु नऊ लाख दंडाची शिक्षा ठोठावली . या निकालाविरुद्ध त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अपील दाखल केले . सदर अपील क्र १९४/२०१९ मध्ये कायद्याची बाजू तपासून आरोपी महिलेने दिलेला धनादेश हा सुरक्षेसाठी असल्याचा निर्णय सत्र न्यायालय औरंगाबाद यांनी घेऊन आरोपी शिक्षिका सुनीता मोहन कोरडे यांना अखेर दोषमुक्त केले. सत्र न्यालायातील अपिलामध्ये आरोपी महिलेच्यावतीने ऍड. विकास देशमुख , माजलगाव जि. बीड यांनी बाजू मांडली.
दरम्यान या निर्णयामुळे धनादेशाचा गैरवापर करणाऱ्यांना चपराक बसणार असून या प्रकरणात आपणास आठ वर्षे आर्थिक व मानसिक त्रास झाला परंतु अखेर आपणास न्यायाचे मिळाला असून या प्रकरणात अब्रू नुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचे वार्ताहरांशी बोलताना सांगितले.