GujaratNewsUpdate : गुजरातच्या मुख्यमंत्रीपदासाठी भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब

गांधीनगर : गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे वृत्त असून यासंदर्भात पक्षाकडून औपचारिक घोषणा केली जाणार आहे. गुजरात भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला . यावेळी एकमताने भूपेंद्र पटेल नेतेपदी निवडले गेले. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी स्वतःच भूपेंद्र पटेल यांचे नाव सुचवले. त्यावर भाजप आमदारांनी सहमती दिली आणि पक्षानेही त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
Gujarat: BJP MLA Bhupendra Patel elected as the new leader of BJP Legislative Party pic.twitter.com/nXeYqh7yvm
— ANI (@ANI) September 12, 2021
गुजरातच्या पुढील वर्षी होत असलेल्या निवडणूक नजरेसमोर ठेवून आणि पाटीदार पटेल समाजाची नाराजी दूर करण्यासाठी भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे बोलले जात आहे. आनंदीबेन यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार केल्यानांत पटेल समाज नाराज झाला होता. नूतन मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे आनंदी बेन यांचे निकटवर्तीय मानले जातात. दरम्यान विजय रुपाणी यांनी शनिवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर गुजरातचे नवे मुख्यमंत्री कोण असणार ? यावरून तर्कवितर्क लढवले जात होते. पण भाजपने चर्चेत असलेल्या नावांना फाटा देत सर्वांना धक्का देणारा निर्णय घेतला. गुजरात भाजपच्या विधिमंडळपक्षाने भूपेंद्र पटेल यांची मुख्यमंत्रीपदाचीसाठी निवड केली आहे. गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल ज्या मतदारसंघातून निवडून येत होत्या त्याच घाटलोडिया मतदारसंघातून भूपेंद्र पटेल हे निवडणून आले आहेत. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी स्वतःच विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत भूपेंद्र पटेल यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. यानंतर केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी भूपेंद्र पटेल यांच्या नावाची घोषणा केली.
विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांचे नाव आघाडीवर होते. मुख्यमंत्रीपदाचे ते प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र लोकप्रिय, अनुभवी आणि सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणारा नेता मुख्यमंत्री व्हावा, असे नितीन पटेल यांनी भाजपच्या विधिमंडळ पक्षाचा बैठकी पूर्वी म्हटले होते त्यामुळे त्यांनी स्वतःच भूपेंद्र पटेल यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग सुकर केला.