MumbaiCrimeUpdate : धक्कादायक : मुंबईत निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती , बलात्कार करून महिलेच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर दुखापत

मुंबई : मुंबईच्या साकीनाका परिसरात दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती घडली असल्याचे संतापजनक वृत्त आहे. या घटनेतही एका ३० वर्षीय महिलेवर नराधमांनी तिच्या प्रायव्हेट पार्टला इजा करून तिला गंभीर जखमी केले आहे. तिच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या अंतर्गत अवयवांना जखमा झाल्या आहेत. या घटनेतही आरोपीने तिच्या गुप्तांगात रॉड घातल्याची शंका डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. सध्या महिलेवर शस्त्रक्रिया सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील साकीनाका परिसरात हि घटना घडली आहे. या प्रकरणात आरोपीने महिलेवर बलात्कार करून तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड घातला. घटनेची माहिती मिळताच आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात भादंविच्या कलम ३०७, ३७६, ३२३, आणि ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान या प्रकरणात आणखी काही जणांचा समावेश असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.