ट्रोलर्सच्या ट्रोल्सने पार्थ पवार झाला हैराण !! त्याचे प्रत्येक कृत्य होऊ लागले ट्रोलचा विषय …

मावळचे उमेदवार पार्थ पवार , अजित पवारांचे चिरंजीव यांच्या मागावर जणू ट्रोलर चांगलेच हात धुवून लागले आहेत . त्याने काहीही केले कि , त्याच्या व्हिडीओ व्हायरल केले जात आहेत . मग त्याचे पहिले भाषण असो , उलट्या रेल्वेने प्रवास असो, सभेला उशीर होऊ नये म्हणून केलेली पळापळ असो त्याचे प्रत्येक कृत्य ट्रॉल केले जात आहे . आता असेच ते मुंबई महामार्गावरून जात असताना रस्त्यात लागलेल्या दापोडीतील विनियार्ड चचेर्चे वादग्रस्त फादर पास्टर डेव्हिड सिल्व्हवे आणि जयश्री सिल्व्हवे यांच्या भेटीमुळे पुन्हा पार्थला ट्रोल केले जात आहे .
दापोडीतील विनियार्ड चर्चेमध्ये शनिवारी सायंकाळी सातवाजता पार्थ पवार प्रचारासाठी पोहोचले होते. त्यांच्यासोबत शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार अण्णा बनसोडे, नगरसेवक रोहित काटे, नगरसेविका माई काटे, स्थायी समितीचे माजी सभापती अतुल शितोळे उपस्थित होते. ‘तुझी शक्ती माझ्यात आणि माझी शक्ती तुझ्यात’ असे आशीर्वाद फादर पास्टर डेव्हिड सिल्व्हवे आणि जयश्री सिल्व्हवे यांनी दिले. दरम्यान, असाध्य रोगांवर उपचार करत असल्याचा फादर पास्टर डेव्हिड सिल्व्हवे दावा करतात. त्यामुळे ते वादग्रस्त ठरले होते. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनाच्या कार्यर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. अंधश्रद्धा पसरविणा-या धर्म गुरुची भेट घेतल्याने पार्थ पुन्हा एकदा ट्रोल झाले आहेत.