MumbaiNewsUpdate :अँटिलियासमोरील स्फोटंक आणि मनसूख हिरेन हत्येप्रकरणी एनआयएकडून न्यायालयात आरोपपत्र दाखल

मुंबई : बहुचर्चित अंबानींच्या अँटिलियासमोरील स्फोटंक आणि मनसूख हिरेन हत्येप्रकरणी एनआयएकडून मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणात आरोपींविरोधात यूएपीए कायद्यांतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आलीअसून सचिन वाझे आणि प्रदीप शर्मासह अन्य ८ जण एनआयएच्या ताब्यात आहेत.
सीबीआयच्या माहितीनुसार दि. २५ फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली एक स्कॉर्पियो कार आढळून आली होती.तर या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह यानंतर काही दिवसांनी म्हणजेच ५ मार्च रोजी कळव्यातल्या खाडीमध्ये सापडला होता. आधी या प्रकरणाचा तपास दहशतवादविरोधी पथक करत होतं. मात्र, त्यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार, हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आला होता.
या दोन्ही प्रकरणातल्या आरोपांवरुन वाझे यांना एनआयएकडून अटक कऱण्यात आली आहे.यापूर्वी ४ ऑगस्टला आरोपपत्र दाखल करण्यासाठी एक महिन्यांचा अवधी मागितला होता. एनआयए अँटिलाया स्फोटकं प्रकरणासोबत मनसूख हिरेन हत्या प्रकरणाचाही तपास करत आहे. आज कोर्टात एनआयएनंने आरोपपत्र दाखल केले.
NIA submits its chargesheet in Antilia Bomb Scare and Mansukh Hiren murder cases before a Special NIA court in Mumbai. Dismissed Mumbai Police officers Sachin Waze pic and Sunil Mane & suspended Police officer Riyazuddin Qazi are accused in custody in this case. pic.twitter.com/yw5wBIEAQm
— ANI (@ANI) September 3, 2021