IndiaNewsUpdate : प्रेमवेड्या मुलीचा प्रताप , कुटुंबियांना झोपेच्या गोळी देऊन प्रियकरासोबत झाली पसार !!

पानिपत : हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातील किला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एका अल्पवयीन मुलीने स्वतःच्या कुटुंबियांना बेश्य्द्ध करून प्रियकरासोबत बाहेरची वाट धरली आहे. यावेळी तिने घरातून चक्क ६५ हजार रुपये रोख, साडेतीन तोळे सोने आणि तब्बल ४० तोळे चांदीचे दागिने देखील आपल्यासोबत घेतले आहेत. बेपत्ता मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून किल्ला पोलीस ठाण्यात आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू झाला आहे.
या विषयी अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले कि , बेपत्ता मुलीचे वडील एका कारखान्यात काम करतात. त्यांना तीन मुली आहेत. त्यांच्या दोन मुलींची लग्न झाली आहेत. तर सर्वात लहान मुलगी १७ वर्षांची आहे. या लहान मुलीने मंगळवारी रात्री कुटुंबातील सर्वांना भाजीमध्ये झोपेच्या गोळ्या मिसळून खाऊ घातलं. त्यामुळे, ते आणि कुटुंबातील इतर सदस्य दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता उठण्याऐवजी सकाळी ९ पर्यंत देखील उठू शकलो नाही.
जेव्हा ते शुद्धीवर आले तेव्हा त्यांनी पाहिलं की आपली मुलगी घरात नाही आणि घरातील सर्व काही विखुरलेलं आहे. पैसे आणि दागिने गायब होते. यापुढे तपासानंतर असं आढळून आलं की, शेजारचा एक तरुण देखील रात्रीपासून बेपत्ता आहे. मुलीच्या वडिलांनी सांगितलं की, आरोपी तरुणाने मुलीला आमिष दाखवून पळवून नेलं आहे. याविषयी आरोपींच्या नातेवाईकांशी बोलून देखील त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर किल्ला पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.