NarayanRaneNewsUpdate : नारायण राणे यांच्या अटकेचे नाट्य असे रंगले , पत्रकारांवर राणेंनी फेकल्या खुर्च्या !!

रत्नागिरी: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरमधील गोळवली येथून पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे वृत्त आहे. राणे यांना स्थानिक कोर्टात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, राणे यांचा जामीन अर्ज स्थानिक कोर्टाने फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. मात्र तिथेही त्यांच्या अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार देण्यात आला आहे. त्यामुळे राणे यांन तूर्त कोणताही दिलासा मिळू शकलेला नाही. दरम्यान, राणे यांच्यावरील कारवाईचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या माध्यम प्रतिनिधींवर राणे समर्थकांना दोन खुर्च्या फेकल्याने तणाव निर्माण झाला. त्यावर प्रमोद जठार यांनी सर्वांची माफी मागत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान भाजपकडून मात्र वेगळा दावा करण्यात आला आहे. रत्नागिरी पोलीस नारायण राणे यांना अटक करण्यासाठी आले आहेत. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा अटक वॉरंट नाही. पोलीस अधीक्षकांकडे आम्ही वॉरंटची मागणी केली. मात्र ते वॉरंट दाखवू शकले नाहीत, असा दावा यावेळी भाजपचे प्रमोद जठार यांनी केला आहे. राणे यांना अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकण्यात येत आहे. पोलीस अधीक्षकच तसे बोलले आहेत. कोणत्याही वॉरंटशिवाय केंद्रीय मंत्र्यावर अशी कारवाई करायला हे काय जंगलराज आहे का?, असा सवालही जठार यांनी करून पोलिसांनी त्यांना जेवताना अटक केल्याह आरोप केला.
दरम्यान पोलीस अधीक्षकांनी याबाबत पालकमंत्री अनिल परब यांच्याशी संपर्क साधून वस्तुस्थिती सांगितली. राणे यांच्याकडून अटक वॉरंटची मागणी करण्यात आल्याचे अधीक्षकांनी सांगितले. त्यावर सत्र न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने आणखी वॉरंटची वाट पाहण्याची गरज नाही. तुम्ही वाट कशाला पाहता. पोलीस फोर्स वापरून अटकेची कारवाई करा, असे परब यांनी अधीक्षकांना सांगितले. यावरूनही मोठा वाद झाला असून आम्ही राज्यपालांकडे तक्रार करणार असल्याचे विरोधी पक्षाने म्हटले आहे.
दरम्यान, पोलिसांनी राणे यांना त्यांच्याच कारमध्ये बसवून घेऊन गेले आणि ताब्यात घेतल्यानंतर अटकेची प्रक्रिया सुरू केली असून नारायण राणे यांची तब्येत बिघडल्याचे वृत्त आहे. नारायण राणे संगमेश्वर येथील गोळवली येथे असून तिथे शासकीय डॉक्टर त्यांची तपासणी करण्यासाठी दाखल झाले आहेत. राणे यांचा रक्तदाब आणि रक्तातील साखर वाढली असल्याची माहिती सिंधुदुर्गातील भाजपचे नेते प्रमोद जठार यांनी माहिती देताना सांगितले आहे.