KabulNewsUpdate : १५० भारतीयांच्या अपहरणाचे वृत्त , तालिबांकडून इन्कार

काबुल : अफगाणिस्ताच्या काबुल विमानतळावरून एक गंभीर बातमी समोर येत आहे. ती म्हणजे साधारण १५० नागरिकांना काबूल विमानतळाबाहेर तालिबान्यांनी ताब्यात घेतले आहे.काबूल विमानतळाच्या प्रवेशद्वारावरुन तालिबान्यांनी ज्या नागरिकांना ताब्यात घेतले आहे. त्यातले अनेक जण भारतीय असल्याची माहिती एएनआयने दिली आहे.मात्र तालिबानी प्रवक्ते अहमदुल्लाह वसेक याने १५० भारतीयांचे अपहरण केलेले नसल्याचा दावा अफगाण प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे.
Multiple Afghan media outlets report kidnapping by Taliban of persons awaiting evacuation from #Kabul. Among them are reported to be Indian citizens. No official confirmation of this, more details awaited
— ANI (@ANI) August 21, 2021
दरम्यान परराष्ट्र मंत्रालय याविषयी अधिक माहिती घेत असून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यास मंत्रालयाने नकार दिला आहे. काही तासांपूर्वीच भारतीय हवाई दलाने काबूलमधून ८५ भारतीयांना बाहेर काढले आहे. हे विमान ताजिकीस्तानमध्ये उतरवण्यात आलं आहे. अजून एक विमान बचावकार्यासाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.