CoronaIndiaUpdate : कोरोनाबाधितांची घट दिलासादायक पण काळजी घेणे महत्वाचे…

नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासात ३२ हजार ९३७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यापैकी १८ हजार ५८२ रुग्ण केरळ राज्यातील असून ४,७९७ रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत. राज्यातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या ३.८१ लाखांच्या खाली आली आहे. देशात काल दिवसभरात ४१७ मृत्युंची नोंद झाली. पैकी १०२ मृत्यू केरळ राज्यातील असून १३० मृत्यू महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे आता देशातील करोना मृत्युंचा आकडा ४ लाख ३१ हजार ६४२ वर पोहोचला आहे.
दरम्यान देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होताना दिसत असली तरीही मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि इतर सर्व करोना प्रतिबंधक नियमांचं पालन करणं आवश्यक आहे.
देशात काल दिवसभरात १७ लाख ४३ हजार ११४ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. पैकी १२ लाख ७२ हजार ८२९ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या ४ लाख ७० हजार २८५ इतकी आहे. त्यामुळे आता लस घेतलेल्या नागरिकांची एकूण संख्या ५४ कोटी ५८ लाख ५७ हजार १०८ वर पोहोचली आहे.