India NewsUpdate : प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज अपघातात जखमी

मुंबई : प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. खुद्द प्रकाश राज यांनीच ट्विटरवरून आपल्या चाहत्यांना अपघात झाल्याची आणि त्यांच्यावर हैदराबाद येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. प्रकाश यांनी हे ट्विट केल्यानंतर त्यांच्या असंख्य चाहत्यांनी त्यांची तब्येतीमध्ये लवकर सुधारणा होवो, अशा आशयाच्या कॉमेन्ट केल्या आहेत.
प्रकाश यांचा अपघात झाल्यानंतर उलटसुलट बातम्या सोशल मीडियावरून व्हायरल झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर प्रकाश राज यांनी स्वतः ट्विट करून नेमके काय झाले याची माहिती दिली आहे.त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘मला अपघात झाला आहे. त्यामध्ये फ्रॅक्चर झाले आहे. आता मी हैदराबाद येथील माझे डॉक्टर मित्र डॉ. गुरुदेवा रेड्डी यांच्याकडे जात आहे. ते माझ्यावर शस्त्रक्रिया करणार आहे. मी ठीक आहे, काळजी करण्याचे काही कारण नाही. माझ्याबद्दल सकारात्मक विचार करा…’ असे त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.
A small fall.. a tiny fracture.. flying to Hyderabad into the safe hands of my friend Dr Guruvareddy for a surgery. I will be fine nothing to worry .. keep me in your thoughts 😊😊😊🤗🤗🤗
— Prakash Raj (@prakashraaj) August 10, 2021