टोकियो ऑलिम्पिक २०२० : मीराबाई चानूने मिळवून दिले भारताला पहिले पदक , अभिनंदनाचा वर्षाव

टोकियो : टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये भारताची स्टार महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने ४९ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले आहे. भारतीय वेटलिफ्टिंगच्या इतिहासातील ऑलिम्पिकमधील हे भारताचे दुसरे पदक आहे. सिडनी ऑलिम्पिक (२०००) मध्ये कर्णम मल्लेश्वरीने भारताला कास्य पदक मिळवून दिले होते. तर आता ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी मीराबाई चानू ही पहिली भारतीय वेटलिफ्टर आहे.
https://twitter.com/airnewsalerts/status/1418838182452359168
पहिल्या प्रयत्नात मीराबाईने ८४ किलो आणि दुसर्या प्रयत्नात ८७ किलो वजन उचलले. मात्र तिसऱ्या प्रयत्नात ती ८९ किलो वजन उचलण्यात अपयशी ठरली. स्नॅच फेरीत तिने दुसरे स्थान पटकावले. ९४ किलो वजनासह चिनी वेटलिफ्टर हौ झीहूने पहिले स्थान मिळवले. यानंतर मीराबाई चानूने आपल्या क्लीन अँड जर्कच्या दुसऱ्या प्रयत्नात ११५ किलो वजन उचलून एक नवीन ऑलिम्पिक विक्रम केला, परंतु चीनच्या हौ झीहूने पुढच्या प्रयत्नात ११६ किलो वजन उचलले. त्यानंतर चानूला झीहूच्या पुढे जाण्यासाठी ११७ किलो वजन उचलण्याची गरज होती, पण ती त्यात अयशस्वी झाली.
Heartiest congratulations to Mirabai Chanu for starting the medal tally for India in the Tokyo Olympics 2020 by winning silver medal in weightlifting.
— President of India (@rashtrapatibhvn) July 24, 2021
दरम्यान या यशाबद्दल राष्ट्रपती राम नाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सचिन तेंडुलकर आणि अनेक मान्यवरांनी मीराबाई चानूवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
Could not have asked for a happier start to @Tokyo2020! India is elated by @mirabai_chanu’s stupendous performance. Congratulations to her for winning the Silver medal in weightlifting. Her success motivates every Indian. #Cheer4India #Tokyo2020 pic.twitter.com/B6uJtDlaJo
— Narendra Modi (@narendramodi) July 24, 2021
हे पदक जिंकल्यानंतर मीराबाई चानुने हे पदक आपल्याला नक्की मिळणार, हे समजले होते याचा खुलासा करताना तिने म्हटले आहे कि,” खरे तर सुवर्णपदक पटकावण्यासाठी मी प्रयत्नांची शर्थ केली, पण हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. पण असे असले तरी आपल्याला पदक मिळणार हे मला समजले होते. कारण जेव्हा मी दुसऱ्यांदा वजन उचलले तेव्हाच मला समजले की, आता आपल्याला पदक नक्कीच मिळणार आहे. पण त्यानंतरही माझे लक्ष विचलित झाले नाही. कारण ती वेळ माझ्यासाठी फार महत्वाची होती. भारताला पहिले पदक जिंकवून देऊ शकले, याचा अभमान नक्कीच मला आहे. या पदकानंतर मी खूष आहे. सतत चार वर्षे घेतलेल्या मेहनतीला आज अखेर फळ मिळाले आहे. माझ्यावर आता कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यामुळे मी देशवासियांचे मनापासून आभार मानते. कारण त्यांनी मला आतापर्यंत चांगलाच पाठिंबा दिला आहे. मी जेव्हा स्पर्धेत उतरत होते तेव्हा सर्व देशवासियांचे लक्ष माझ्यावर लागलेले होते. देशवासियांच्या माझ्याकडून पदकाचा अपेक्षा होत्या, त्यांच्या अपेक्षांची पूर्ती मला करता आली, याचा सर्वात जास्त आनंद आहे.”
चानूने कामगिरीत केली सुधारणा
मीराबाई २०१७ मध्ये वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपची (४८ किलो) विजेती ठरली. यावर्षी एप्रिलमध्ये तिने ८६ किलो स्नॅच आणि विश्वविक्रमी ११९ किलो वजन उचलून विजेतेपद जिंकले. तिने एकूण २०५ किलो वजन उचलून कांस्यपदक जिंकले. २०१६ ची रिओ ऑलिम्पिक स्पर्धा चानूसाठी निराशाजनक होती. पण त्यानंतर तिने सतत आपला खेळ सुधारला. २०१७मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि २०१८ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये तिने सुवर्णपदक जिंकले.