Tokyo Olympics 2020 : जाणून घ्या उद्याचे सामने , भारताला किती पदक मिळतील ?

टोकियो : अखेर एक वर्षाच्या विलंबानंतर कोरोना व्हायरसच्या भीतीसह जपानची राजधानी टोकियो येथे ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या वर्षी भारतीय पथकात २२८ सदस्य आहेत. यात ६९ पुरुष आणि ५५ महिलांचा समावेश आहे. भारतीय खेळाडू एकूण ८५ पदकांसाठी मैदानात उतरतील. उद्या २४ जुलै रोजी भारतीय खेळाडू नेमबाजी, तिरंदाजी, हॉकी, ज्युडो, रोव्हिंग, टेबल टेनिस, टेनिस, बॅटमिंटन, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग अशा स्पर्धेतील पहिल्या फेरीचे सामने खेळतील. भारत २५ व्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत आहे. भारत १८ क्रीडा प्रकारांमध्ये १२७ सदस्यांची आतापर्यंतची सर्वात मोठी टीम पाठवित आहे. ही स्पर्धा २३ जुलै ते ८ ऑगस्टदरम्यान खेळली जाणार आहे.
भारत या वर्षी १७ ऑलिम्पिक पदकं जिंकले असा अंदाज ग्लोबल स्टोर्ट्स डेटा कंपनीने केला आहे. गेल्या दोन वर्षांत आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे यश मिळविणाऱ्या 15 नेमबाजांकडून भारताला सर्वांत जास्त पदक जिंकण्याच्या अपेक्षा आहेत. १९ वर्षीय मनु भाकर, २० वर्षीय इलावेनिल वालारिवान, १८ वर्षीय दिव्यांश सिंह आणि २० वर्षीय ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर यांना नक्कीच पदक मिळेल, असा विश्वास वर्तवला जात आहे.
याआधी भारताने लंडन २०१२ ऑलिम्पिकमध्ये भारताने २ रौप्य आणि ४ कास्य पदक जिंकले होते. त्याआधी २००८च्या बिजिंग ऑलिम्पिकमध्ये १ सुवर्ण, २ रौप्यसह ३ पदक जिंकली होती. २०१६च्या रिओ ऑलिम्पिक, १९५२च्या हेलसिंकी, १९००च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने प्रत्येकी २ पदक जिंकली होती.
कुठे पाहाल या स्पर्धा लाईव्ह
भारतात टोकियो ऑलिम्पिकचे सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर आणि सोनीलाईव्हवर थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. सोनी ५ नेटवर्क चॅनेलवर ४ भाषांमध्ये ऑलिंपिकचे थेट प्रसारण करेल. ऑलिम्पिक खेळ टोकियो २०२० ची थेट लाईव्ह २३ जुलै ते ८ ऑगस्ट २०२१ रोजी सोनी सिक्स, सोनी टेन १, सोनी टेन २, सोनी टेन ३ आणि सोनी टेन ४ चॅनेलवर सुरू होईल. याशिवाय सोनीलाईव्हवरही ऑलिम्पिक खेळांचे प्रसारण करणार आहे. सोनी स्पोर्ट्स नेटवर्क व्यतिरिक्त, राष्ट्रीय प्रसारक प्रसार भारती यांचे दूरदर्शन देखील टोकियो ऑलिम्पिक लाइव्ह प्रसारण करणार आहे. पण दूरदर्शन फक्त टोकियो ऑलिम्पिकमधील भारतीय कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण करणार आहे.