Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : राज्यात ६ हजार ९१० नवे रुग्ण , ७ हजार ५१० रुग्णांना डिस्चार्ज

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई  :  राज्यात  गेल्या २४ तासांत एकूण ६ हजार ९१० नव्या कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. या बरोबरच आज एकूण ७ हजार ५१० इतके रुग्ण बरे झाले आहेत. तसेच, आज दिवसभरात एकूण १४७ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजच्या १४७ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्क्यांवर गेला आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६० लाख ९११ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३३ टक्के एवढे झाले आहे.

Advertisements

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या खाली आली असून ती ९४ हजार ५९३ इतकी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा १५ हजार ०४२ इतका आहे. तर, पुण्याच्या खालोखाल ठाणे जिल्ह्यात एकूण १२ हजार ५४९ इतके रुग्ण आहेत. तर, सांगलीत ही संख्या १० हजार ८४९ इतकी आहे. मुंबई महापालिका हद्दीत सध्या १० हजार ६३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, कोल्हापुरात ही संख्या १० हजार १०० इतकी आहे. साताऱ्यात ही संख्या ६ हजार ७७६, अहमदनगरमध्ये ३ हजार ८८९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, रायगडमध्ये २ हजार ७२७, रत्नागिरीत २ हजार ८७४, सिंधुदुर्गात २ हजार ४९९, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार १९७ इतकी आहे. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या १ हजार ६८१ इतकी झाली आहे.

Advertisements
Advertisements

यवतमाळमध्ये फक्त १५ सक्रिय रुग्ण

या बरोबरच, औरंगाबादमध्ये ६२२, नांदेडमध्ये ही संख्या ४५३ इतकी आहे. जळगावमध्ये ४३९, तसेच अमरावतीत ही संख्या १५० इतकी आहे. आज राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुणे जिल्ह्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या यवतमाळ जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या १५ इतकी आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ५८ लाख ४६ हजार १६५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२ लाख २९ हजार ५९६ (१३.५९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ६० हजार ३५४ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ३ हजार ९७७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!